Agriculture Commissioner : राज्याच्या कृषी आयुक्तपदावरून सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून, राज्याच्या कृषी आयुक्तपदावर आता धडाकेबाज सनदी अधिकारी (Chartered Officer) डॉ. प्रवीण गेडाम (Dr. Praveen Gedam) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त कृषी आयुक्त डॉ. गेडाम यांनी काल पदाची सूत्रे स्वीकारली.
ब्रेकिंग न्यूज : अखेर साखरेच्या निर्यातीवर बंदी
आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी लागलीच राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीची (Drought Monitoring Committee) बैठक घेऊन दुष्काळासंबंधीचा आढावा घेतला. दुष्काळासंबंधीचे जिल्हा समित्यांचे सर्व अहवाल एकत्र करून त्याचा अभ्यास (Study) आणि मूल्यांकन (Evaluation) केले जाणार आहे. त्यानंतर एकत्रित अहवाल राज्य शासनाला पाठविले जाईल. ही कामे तातडीने मार्गी लावावीत, अशा सूचनाही नवनियुक्त कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या आहेत.
आयुक्तपदी श्री. चव्हाण यांना एक वर्षदेखील झालेले नव्हते. त्यांच्या काळात कृषी खात्यात गैरव्यवहारांची (Misconduct) एकापाठोपाठ एक प्रकरणे बाहेर आली. तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांना आयुक्तालयाने विरोध केला नव्हता. दुसऱ्या बाजूला गुणनियंत्रण संचालकांच्या (Director of Quality Control) झालेल्या संशयास्पद बदल्या, कृषिउद्योग विकास महामंडळाच्या (Agriculture Industry Development Corporation) व्यवस्थापकीय संचालकपदावर झालेली वादग्रस्त नियुक्ती, महामंडळातील निविदांमध्ये झालेला गैरव्यवहार (Misconduct) यामुळे कृषी आयुक्तांचे कार्यालय सतत वादाच्या भोवऱ्यात होते.
जलसंधारणाचा बारकाईने अभ्यास असलेला सर्वात ज्येष्ठ अधिकारी म्हणून श्री. चव्हाण यांचा उल्लेख आधीपासूनच होत असे. त्यामुळेच त्यांची नियुक्ती आता राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाच्या (State Soil and Water Conservation Department) सचिवपदी झाली आहे. सध्या मृद जलसंधारण सचिवपदाची तात्पुरती सूत्रे एकनाथ डवले यांच्याकडे आहेत.
नवे कृषी आयुक्त डॉ. गेडाम हे सध्या अध्ययन रजेवर आहेत. राज्यातील धाडसी व अभ्यासू सनदी अधिकारी म्हणून त्यांचा उल्लेख शासनाच्या प्रशासकीय वर्तुळात होत असतो. नागपूर विद्यापीठातून त्यांनी ‘एमबीबीएस’ची वैद्यकीय पदवी (Medical Degree) संपादन केली आहे. 2002 मध्ये महाराष्ट्राच्या तुकडीतून ते भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. 2005 मध्ये जळगाव (Jalgov) महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी राज्यभर चर्चेचा विषय ठरली.
मोठी बातमी : राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पुनश्च पाशा पटेल
जळगावच्या घरकुल योजनेत (Jalgaon Gharkul Scheme) कोट्यवधीचा घोटाळा (Scam) झाल्याचे श्री. गेडाम यांनी शोधून काढले. त्यांनी स्वतः पोलिसांकडे 14 पानांची तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचा खटला तेरा वर्षे चालू होता. या प्रकरणात तत्कालीन आमदार सुरेश जैन (Suresh Jain) यांच्यासह अनेकांना तुरुंगवास झाला होता.
डॉ. गेडाम (Dr. Gedam) यांनी राज्यात सर्वच पदांवर केलेल्या सेवा चर्चेत राहिल्या. सामान्य जनतेकडून त्यांना सतत पाठिंबा मिळत राहिला. लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर व धाराशीवचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी उत्तम काम केले. परिवहन आयुक्त तसेच भूजल सर्वेक्षण आयुक्तपदीदेखील ते कार्यरत होते. नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) भ्रष्ट कारभाराला त्यांनी लगाम घालताच त्यांची उचलबांगडी केली गेली.
त्यानंतर 2017 पासून ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले. तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांचे ते खासगी सचिव होते. त्यानंतर आयुष्यमान भारत (Ayushman Bharat) योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली. अलीकडेच त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर पदवीदेखील प्राप्त केली आहे. केंद्र शासनातील त्यांचा सेवाकाल 27 नोव्हेंबरला समाप्त होईल. त्यापूर्वीच राज्य शासनाच्या मागणीनुसार त्यांना महाराष्ट्राच्या सनदी सेवेत पुन्हा बोलावण्यात आले आहे.
MSP : रब्बीच्या या 6 पिकांच्या आधारभूत किंमतीत वाढ
https://www.facebook.com/shetimitramagazine03