कोरफड वर्गातील ड्रॅगन फ्रुट आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी लक्षवेधी ठरले आहे. या पिकाला रोग आणि किडींचा प्रादुर्भाव नगण्य असल्याने याला अत्याल्प पाणी लागत असल्याने याची लागवड कोरडवाहू भागात वाढण्यासाठी मोठा वाव आहे. राज्यातील कमी पावसाच्या जिल्ह्यात मुख्यत: सोलापूर, पुणे, सांगली आणि आता मराठवाड्यातील काही जिल्ह्यात ड्रॅगन लागवडीचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. आधुनिक तंत्राचा वापर करून याची लागवड केली तर नक्कीच हे लक्षवेधी फळपिक शेतकर्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे.
फायद्याची गोष्ट : शिकूण घ्या ! आवळा लागवडीचे उत्पादन तंत्रज्ञान
ड्रॅगन हे फळ दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असल्याने लोकांमध्ये त्याची फार उत्सुकता आहे. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी, ही झाडी कायमची जळून जात नाहीत. फळांचा आकार कमी होईल, मात्र झाडे जिवंत राहतील. या पिकाला रोग आणि किडींचा प्रादुर्भाव नगण्य असून पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही.
या फळाची साल अतिशय पातळ व गर लाल व पांढऱ्या रंगाचा असून हे फळ चवीला गोड आहे. या फळाचा उपयोग विविध प्रक्रिया करून खाद्य उद्योगात केला जातो. जसे की, फळाचा रस, शरबत, जाम, काढा (सिरप) आइस्क्रीम, योगर्ट, मुरंबा (जेली), कँडी पेस्ट्री इ. कधी कधी फळाचा गर हा पिझ्झा किंवा वाईन तयार करण्यासाठी देखील केला जातो. या फळाचे औषधी उपयोग पण आहेत. डेंग्यू व मलेरिया आजारात हे फळ खाल्ले जाते, असे मानतात. हे फळ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व पांढऱ्या पेशीही वाढण्यास मदत होते.
जमीन : ड्रॅगन फ्रुट साधारणता सगळ्या प्रकारच्या जमिनीत घेता येते परंतु पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन या पिकासाठी पूरक असते सेंद्रिय कर्ब असलेली चिकन मातीची जमीन उत्तम लाभदायक ठरते साधारणता जमिनीचा समू हा 5.5 ते 7.5 असावा. जातीवरून या फळाचे तीन प्रकार पडतात ते खालील प्रमाणे आहेत
1) फळांची वरची साल गुलाबी आणि गर गुलाबी
2) फळांची वरची साल गुलाबी आणि गर पांडरा
3) फळांची वरची साल पिवळी आणि गर पांडरा
हवामान : ड्रॅगन फ्रुट फळासाठी उष्ण कटिबंधीय तापमान आवश्यक असते अश्या उष्ण भागामध्ये हे पीक उत्तम येते साधारणतः 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान योग्य असते जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश या पिकास लाभदायक ठरतो 100 ते 150 सेंटीमीटर पाऊस या पिकाच्या वाढीस योग्य असतो जास्त प्रमाणात पाऊस, धुके व दमट वातावरण या पिकास हानिकारक ठरते तसेच जास्त प्रमाणात पाऊस झाला तर फुल व फळांची गळ होते
अभिवृद्धी : ड्रॅगन फ्रुट हे वेलवर्गीय फळझाड असून त्याची अभिवृद्धी कटिंग किंवा बियाण्यापासून केली जाते परंतु बियाणापासून उगवण केली तर प्रत्येक झाडामध्ये वेगळेपणा दिसून येतो म्हणून व्यवसायिक दृष्ट्या अभिवृद्धी करण्यासाठी कटिंग ही पद्धत वापरणे योग्य आहे
जमिनीची मशागत : जमिनीची मशागत करताना दोन ते तीन वेळा नांगरणी करून जमीन भुसभुशीत करून उन्हात तापवून घ्यावी. झाडांना आधार देण्यासाठी सिमेंटचे पोल उभा करावेत हे पोल 12 सेंटी मीटर रुंद आणि 2 मीटर उंच असावेत एका हेक्टर साठी बाराशे ते तेराशे पोल उभारावेत दोन झाडांमधील व दोन ओळीतील अंतर हे तीन बाय तीन मीटर असावे उत्पन्न वाढीसाठी व आरोग्यदायी फळे मिळवण्यासाठी 45 ते 50 सेंटिमीटर उंच असलेली रोपे लागवडी साटी वापरावीत. साधारणतः जून- जुलै मध्ये या पिकाची लागवड करावी एका पोलला चार रोपे याप्रमाणे लागवड करावी
फायद्याच्या टिप्स : अंजीर उत्पादनाचे नियोजनबद्ध व्यवस्थापन !
पाणी व्यवस्थापन : ड्रॅगन फ्रुट हे फळ उत्तम पाण्याचा तहान सहन करणारे पीक आहे काही आठवड्यापासून ते महिन्यापर्यंत हे पीक पाण्याचा ताण सहन करू शकते या पिकाला खूप कमी पाणी लागते फळ तयार होत असताना आठवड्याला दोन वेळेस पाणी देणे आवश्यक आसते तीव्र उन्हाळ्यामध्ये रोज प्रती झाड एक ते दोन लिटर पाणी द्यावे
खत व्यवस्थापन : अधिक उत्पन्नासाठी या पिकाला जास्त प्रमाणात खते द्यावी लागतात सुरुवातीच्या काळात चंगलया वाढीसाठी नत्र हे जास्त प्रमाणात द्यावे लागते पण नंतरच्या काळात स्फुरद आणि पालश ची मात्र अधिक प्रमाणात द्यावी लागवड करते वेळी प्रत्येक सिमेंट खंबा भोवती एक पाटी चांगले खुजलेले शेणखत घालतात एका वर्षानंतर फळ धरणा झाल्यानंतर प्रति झाडास 200 ग्रॅम सुपर फॉस्फेट, 200 ग्रॅम पोटॅश, 100 ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्य, व 50 ग्रॅम सिलिकॉन ची मात्र देतात फळांचा बहार धरण्यासाठी वर्षातून एकाच वेळेस ही मात्र द्यावी लागते
लागवड : ड्रॅगन फळ पिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्वमशागत झाल्यावर दोन झाडांमध्ये ३ मीटर व दोन रांगेत 3 मीटर अंतर ठेवून 60 सें. मी. × 60 सें. मी. आकारमानाचे खडडे खोदून घ्यावेत. यामध्ये एकरी 445 झाडे बसतात. खडडे खोदून झाल्यावर खड्ड्याच्या मधोमध सिमेंट काँक्रीटचे खांब किंवा जी.आय. पोल आकाराचे पाईप पक्के बसवून घ्यावेत. या फळझाडाला पोल तसेच फ्रेमचा आधार देऊन वळवावे लागते.
पोलची उंची कमीत कमी 6 फूट ठेवावी. नंतर खड्डे भरताना प्रत्येक खड्ड्यात अंदाजे 10 किलो चांगले कुजलेले शेणखत व चांगली माती, रेती आणि 200 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण टाकावे. त्याचप्रमाणे पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी खड्ड्यांच्या तळाशी बारीक विटांचे तुकडे टाकावेत. खडडे भरण्याचे काम पूर्ण झाल्यावर प्रत्येक खड्ड्यात पोलच्या समोरासमोर मुळ्या फुटलेल्या चार कटिंग्ज लावून घ्याव्यात.या लावलेल्या कटिंग्जची उभी वाढ होण्यासाठी झाडे वाढतील तसे खांबांना बांधून घ्यावीत. झाडांची लागवड झाल्यावर प्रत्येक काड्यांवर सेंद्रिय पदार्थाचे 20 ते 25 सें. मी. उंचीचे आच्छादन करून झाडांना पाणी द्यावे. झाडांची वाढ उंच होत जाईल. तसे त्यांना खांबांना बांधून घेत जावे. लागवडीसाठी प्रति एकरी 3 लाख रुपये खर्च येतो.
मंडप उभारणे ((Trellising) : ड्रॅगन फळ हे वेलवर्गीय असल्या कारणाने त्याच्या वाढीसाठी मंडप/लाकडाच्या आधाराची गरज असते. ड्रॅगन फळाची लागवड करताना प्रत्येक वेलीला खांबाच्या आधाराची गरज असते. या वेलींचे आयुष्य हे 20 वर्षे असल्याकारणाने खांब हे मजबूत असणारे आवश्यक आहे. ड्रॅगन फळ 2 वर्षाचे झाल्यावर वेलीचे वजन हे 100 कि. ग्रॅ. पर्यंत जाते व चालू वर्षात खांब बदलणे जिकिरीचे काम असल्याने सुरुवातीलाच सिमेंट काँक्रीटचे खांब बसवणे उत्तम. खांबाची जाडी 100-500 मि. मी. व उंची 2 मी. असावी. वेलीची व्यवस्थित वाढ होण्याकरिता खांबाच्या टोकाला स्टीलची रिंग ज्याला रबरचे टायर असावे, अशी वापरावी.
वळण देणे : झाडाची उंची पोल पर्यंत गेल्यानंतर खालून 2 ते 3 मुख्य खोडांची वाढ करून पोलवर गोल फ्रेम लावलेल्या जागी त्याची वाढ होऊ द्यावी पोलला बंदलेल्या खोडावरील वाढलेले फुटी वारंवार नियमित छाटून टाकाव्यात गोल फ्रेम वरती असलेल्या खोडांची वाढ करून नंतर खालच्या बाजूला वाढू द्यावेत
छाटणी : फळांची काढणी संपल्यानंतर झाडांची दरवर्षी नियमित छाटणी करणे आवश्यक आहे. छाटणी करताना झाडांचा वरील भाग छत्रीच्या आकाराचा राहील, असे पाहावे आणि अडचणीच्या फांद्यांची छाटणी करावी म्हणजे संपूर्ण झाडाला आतपर्यंत सूर्यप्रकाश मिळू शकेल. नियमित छाटणी केल्यास झाडांवर नवीन फूट येऊन पुढील वर्षात जास्त फळांचे उत्पादन मिळू शकते. उत्तम व्यवस्थापन व मशागत असल्यास ड्रॅगन फळाचे 4 ते 10 टन प्रति एकर उत्पादन मिळते. सध्या बाजारात ड्रॅगन फळाचा दर रु. 100 ते 250 रुपये प्रति किलोपर्यंत आहे. महाराष्ट्रातील उष्ण हवामान असणाऱ्या जिल्ह्यांतील प्रयोगशील शेतकऱ्यांनी या फळ पिकांची लागवड केल्यास निश्चितपणे फायदेशीर ठरते.
रोग व कीड व्यवस्थापन : या पिकावर किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो पिटया ढेकूण काही प्रमाणात आढळतो त्याच्या नियंत्रणासाठी नुवाण 1.5 मिली प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी
फळधारणा : फुले आकाराने मोठी, पांढऱ्या रंगाची, आणि संध्याकाळी-रात्री उमलणारी असतात. विविध अंतराने फुले आढळून येतात. फुले येण्याची वेळ पावसावर अवलंबून असते, जसा पाऊस सुरू होईल तशी फुले उमलण्यास सुरुवात होते. जूनपासून ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत फुले आढळून येतात. फळमाशीच्या नियंत्रणासाठी बागेत सापळे लावावेत. परागीकरणापासून साधारणपणे एक ते सव्वा महिन्यात फळ तोडण्यास तयार होते. या पिकामध्ये फळधारणा होण्याकरिता प्रभावी परागीकरण होणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी रोपण करताना मिश्र प्रजाती एकत्रितपणे लागवड केल्याने फायदेशीर ठरू शकते. हे फूल संध्याकाळी-रात्री उमलत असल्याने वटवाघूळ, होक, पतंग, आणि मधमाशी इत्यादी पासून मुख्यतः परागीकरण होते.
काढणी : लागवड झाल्यानंतर 18 ते 24 महिन्यानंतर फळे यायला सुरुवात होते फुलोरा आल्यावर तीस ते पन्नास दिवसात फळे परिपक होते फळाचा रंग हा अपरिपक अवस्थेमध्ये हिरवा असतो नंतर तो परिपक्व अवस्थेत लाल किंवा गुलाबी होतो फळ लागण्याचा कालावधी हा 3 ते 4 महिने असतो या कालावधीमध्ये फळांची काढणी 3 ते 4 वेळेस होते.
भोसले गणेश हनुमंत, सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, लोकमंगल कृषि महाविद्यालय, वडाळा.