सततच्या हवामान बदलांमुळे सध्या आंबा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. परतीच्या पावसानंतर झालेल्या हवामानातील बदलामुळे सध्या 90 टक्के आंब्याच्या झाडांना पालवी तर केवळ 10 टक्के झाडांनाच मोहोर दिसत आहे. एकंदरीत यंदा मोहोर प्रक्रिया लांबण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी यंदा आंबा उत्पादन घटून उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता वाढली आहे.
गेल्या दोन दिवसांच्या ढगाळ हवामानामुळे आंबा बागेत तुडतुड्यांचा तसेच काही ठिकाणी थ्रीप्सचाही प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना किटकनाशकांची फवारणी करुन दोन्ही कीडरोग नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
मोठी बातमी : लासलगावात कांद्याचे लिलाव रोखले
यावर्षी परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. त्याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पीक वाया गेली आहेत. परतीच्या पावसाचा मुक्काम यावर्षी दिवाळीपर्यंत लांबला होता. त्यामुळे सध्या 90 टक्के आंबा झाडांना पालवी आली आहे तर केवळ 10 टक्के झाडांना मोहर कागल आहे. दिवसा ऊन आणि रात्री थंडी, पहाटेचे धुके हे हवामान आंबा पिकासाठी पोषक होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. किटकनाशकांची फवारणी करुन दोन्ही कीडरोग नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. हापूसचे चांगले उत्पादन मिळण्यासाठी पालवीवरील थ्रीप्स नियंत्रणात आणण्यासाठी सर्वत्र जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

मोहराला लागलेली अळी जर नष्ठ केली नाही तर तो मोहोर कुजवून टाकतो. तुडतुड्यांचा आंब्यावर प्रादुर्भाव झाल्याने आंब्यांची प्रकाश संसल्शेन प्रक्रिया थांबत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. त्यामुळे झाडांना येणाऱ्या मोहर थांबण्याची दाट शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे बागांवर फवारणी करुन ती बाग वाचवणे हे शेतकतऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे. आंब्याचे पीक चांगले ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागणार असल्याचेही आंबा उत्पादक शेतकरी सांगतात.
मोठी बातमी : कापसाचा भाव घसरणार ?
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात हापूस आंब्यावर तु़डतुडा आणि थ्रीप्स अळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याचा आंब्यावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळ हापूस आंब्याच्या उत्पादकतेत घट येण्याची शक्यता असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
