पोळ्यानंतर सणासुदीचे दिवस सुरू झाले असून, गणेशोत्सव आणि येणाऱ्या गौरीच्या सणामुळे सध्या फुलांचा बाजार बहरला आहे. गणेशोत्सवामुळे फळांची विशेषत: फुलांची मागणी आणि आवकही वाढली असून, सध्जा फुलांच्या भावात मोठी वाढ झाली आहे. यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे बाजारात म्हणावा असा उत्साह नसल्याने फुलांचे भाव गडगडले होते. मात्र सध्याची परिस्थिती पहाता भविष्यात फुलांचे भाव वाढण्याची शक्यता फुल व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
मोठी निर्णय : वन्यप्राणी हल्ल्यातील मृतांच्या वारसांना 20 लाखाची मदत

सध्या पुण्यात गणेशोत्सवामुळे फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे महात्मा फुले मंडई, तुळशीबाग परिसर आणि उपनगरांमधील किरकोळ खरेदी दारांकडून फुलांना मोठी मागणी आहे. गौरी-गणपतीच्या पूजेसाठी लागणाऱ्या झेंडू, शेवंती, ॲस्टर, काकडा इत्यादी फुलांना, तर शोभिवंत फुलांमध्ये गुलाब, कार्नेशन, ग्लॅडिओलससह या वेगवेगळ्या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.
महा ब्रेकिंग न्यूज : खतांच्या किमती कमी होण्याची शक्यता
पुणे कृषी बाजार समितीमध्ये पुणे जिल्ह्याबरोबरच सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर या जिल्ह्यातून झेंडूच्या फुलांची मागणी वाढत आहे. त्यामुळे फुलांची मागणी वाढल्यामुळे फुलांच्या भावात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येते. किरकोळ बाजारात झेंडूच्या फुलांचा भाव हा 160 ते 180 रुपये किलो आहे. शेवंती फुलांचा भाव 70-100 रुपये, ॲस्टर फुलांचा भाव 140-200 रुपये तर गुलछडी फुलांचा भाव 200-300 रुपये आहे. डच गुलाब 20 नगाचा भाव 150-170 तर जरबेराचा भाव 40-60 रुपये असा आहे.
ब्रेकिंग : ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाचा उद्या मेळघाटात शुभारंभ

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1