गेल्या वर्षी अवकाळी पावसाने राज्यातील हजारो हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले होते. त्यातील बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ई-केवायसी अभावी अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही.
हेही वाचा : जिऱ्याची फोडणी महागली : दर 55 हजारांवर
गेल्या वर्षी अवकाळी पावसाच्या जोरदार तडाख्याने हातातोंडाशी आलेले पीक वाया गेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाचे आभाळ कोसळले होते. दरम्यान, शासनाच्यावतीने सुधारित दराने तात्काळ मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अनेक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची ई-केवायसी (E-KYC) न केल्याने त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्या नाहीत.

मागील हंगामामध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर व चालू वर्षी मार्च ते एप्रिल या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे झालेल्या शेतपीके, फळबागांचे मोठे नुकसान झाले. शेतपीकांचा चिखल झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते.
मोठी घोषणा : तर… पेट्रोल 15 रुपये लिटर दराने मिळेल !
महसूल व कृषी विभागाकडून शेतपीकांच्या नुकसानीचा पंचनामा करून शासनाला पाठविण्यात आला. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घेण्यात निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर 1 हजार 500 कोटींच्या निधीला मान्यताही मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली आहे.
शेतपीकांच्या नुकसानीबाबत शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या सर्व तहसील कार्यालये, तलाठी कार्यालये व ग्रामपंचयात कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. परंतु अनेक बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी तसेच बँक खाते आधार कार्डसोबत संलग्न केल्या नाहीत, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनामार्फत नुकसानीची रक्कम जमा झाली नाही.
दरम्यान, अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, त्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
महत्त्वाचे : शेतकऱ्यांच्या अडचणी निवारण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापन

https://www.facebook.com/shetimitramagazine03