राज्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने लिंबाच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी लिंबाच्या किमती वधारल्या आहेत. सध्या बाजारात एका लिंबाची किंमत सात ते दहा रुपयांवर गेली आहे.
ब्रेकिंग न्यूज : पीक नुकसानीची एनडीआरएफच्या नव्या निकषानुसार मिळणार मदत
उन्हाळ्यामुळे होणारी शरीराची लाहीलाही आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर सर्वात उपयुक्त असे लिंबू हे उन्हाळ्यातील त्रासांवर रामबाण उपाय ठरु शकतो. उन्हामध्ये लिंबू सरबत घेतल्यामुळे ताजेतवाने राहण्यास मदत होते. उन्हामुळे शरीरातील कमी झालेली ताकद भरुन येण्यास मदत होते. अशा कारणांने बाजारात लिंबाची मागणी वाढत आहे.

सध्या लिंबाच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने, घाऊक आणि किरकोळ बाजारामध्ये लिंबांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, मागणीच्या तुलनेत लिंबाचा पुरवठा होत नसल्याने लिंबाच्या किमतीत अजून वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
मोठी बातमी : कांदा अनुदानासाठी या कालावधीत करावा लागणार अर्ज !
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नगर, सोलापूर, आंध्र प्रदेशातून लिंबाची आवक होत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही आवक पन्नास टक्के घटली आहे. त्याचा परिणाम लिंबाच्या दरांवर झाला आहे.

दरम्यान, राज्यात वाढत्या उष्म्यामुळे शीतपेयाची मागणी वरचेवर वाढत आहे. अशातच लिंबाच्या दरांमध्ये वाढ झाल्याने शीतपेयांच्या किमतीमध्येही यंदा वाढ झाली आहे. पूर्वी दहा रुपयाला मिळणारा सरबत उपनगरांमध्ये काही ठिकाणी पंधरा रुपयांना मिळत आहे.
हे नक्की वाचा : फायद्याची मोत्यांची शेती

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1