पावसामुळे बांधल्या म्हशी चक्क… बायपासवर  

0
309

सध्या राज्यात पावसाने थैमान घातले असून, कल्याण-डोंबवली भागातसुद्धा मुसळधार पावसामुळे पावसाचे पाणी परिसरातील घरांमध्ये आणि म्हशींच्या तबेल्यांमध्ये शिरले आहे. त्यामुळे नाईलाजास्तव दुग्ध व्यावसायिकांना आपल्या सर्व म्हशी गोविंदवाडी बायपास उड्डाणपुलावर बांधाव्या लागल्या आहेत. हजारो म्हशी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना बांधल्यामुळे बायपास की म्हशींचा तबेला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पावसानेमुळे बऱ्याच भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. कल्याण-डोंबवली भागातसुद्धा मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सतत बरसणाऱ्या पावसामुळे तेथील खाडीच्या पाण्यात वाढ झाली. परिणामी कल्याण पश्चिमेतील दूधनाका आणि परिसर संपूर्ण पाण्याखाली गेला आहे.

लक्षवेधी निणर्य : बाजार समितीच्या निवडणुकीत आता शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क

पावसाचे पाणी परिसरातील घरांमध्ये आणि म्हशींच्या तबेल्यांमध्ये शिरले. त्यामुळे नाईलाजास्तव दुग्ध व्यावसायिकांना आपल्या सर्व म्हशी गोविंदवाडी बायपास उड्डाणपुलावर बांधाव्या लागल्या. हजारो म्हशी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना बांधल्यामुळे बायपास की म्हशींचा तबेला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत जोरदार पावसामुळे खाडीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

महत्त्वाचा निणर्य : आता पुन्हा नगराध्यक्ष, सरपंचाची थेट जनतेमधून

अक्षरशः हे पाणी रेतीबंदर परीसरातील तबेले आणि चाळींमध्ये शिरले. त्यामुळे म्हशी वाचवण्यासाठी दूध व्यावसायिकांना हा जुगाड करावा लागला. दरम्यान, प्रशासनाने या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यांनी आसपासची अनेक घरं रिकामी करुन घेतली आहेत. पावसामुळे उल्हास नदी तसेच डोंबिवली पश्चिमेकडील खाडी पात्राची पाण्याची पातळी वाढली असून, टिटवाळा नजीक असलेला रुंदे पूलही पाण्याखाली गेला आहे.

मात्र ही परिस्थिती केवळ आत्ताची नाही. तर दरवर्षी पावसामुळे या परिसरातील दूध व्यवसायिकांवर अशी परिस्थिती ओढवते. 26 जुलै 2005 साली अति मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरात भयंकर पूर आला होता. त्यावेळीही घरात आणि म्हशीच्या तबेल्यात पाणी शिरले होते. हजारो म्हशी बांधलेल्या तबेल्यात पाणी शिरल्याने त्यांच्या गुदमरून त्यांचा मृत्यू झाला होता. दूध व्यवसायिकांच्या हजारो म्हशी दगावल्याने त्यांना मोठा फटका बसला होता. तेव्हापासून खाडी परिसरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जाणवल्यास तेथील दुग्ध व्यवसायिक आपल्या म्हशी गोविंदवाडी बायपास उड्डाणपुलावर आणून बांधतात.

अतिमहत्वाची बातमी : अलमट्टीतून 1 लाख क्युसेक विसर्ग सुरु : धरण 71 टक्के भरले

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here