हवामान बदलाचा मोठा फटका यंदा रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या गहू आणि हरभरा या पिकाला बसण्याची शक्यता असून, यंदा या दोन्ही पिकांना पोषक असलेली थंडी म्हणावी अशी नसल्याने या पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
खूशखबर : यंदा द्राक्षाच्या विक्रमी निर्यातिची शक्यता
भारत हा गहू लागवडीत जगात पहिल्या क्रमांकावर असून, भारतात गव्ंहाचे सर्वाधिक उत्पादन पंजाब व मध्यप्रदेश या राज्यात होते. त्या खालोखाल गव्हाचे उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते. यंदा देशात गव्हाच्या लागवडीत 10 टक्क्याने वाढ झाली आहे. मात्र यंदा अधून मधून येणाऱ्या ढगाळ वातावरणाचा फटका गहू आणि हरभरा या पिकांच्या उत्पादनावर बसणार असून, महाराष्ट्रात थंडीच्या हंगामात घेतली जाणारी ही दोन्ही पिके यंदा ढगाळ वातारणामुळे संकटात सापडली आहेत. त्यावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. कमी थंडीमुळे येणाऱ्या रोगराईचा सामना करण्यासाठी औषधाच्या फवारण्या करण्याची वेळ गहू आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे या दोन्ही पिकांच्या उत्पादन खर्चात कमालीची वाढ झाली आहे.

गेल्या काही वर्षात जास्तीच्या पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे यंदाच्या रब्बी पिकामध्ये शेतकऱ्यांची गव्हावर मोठी भिस्त होती. चांगले पाणी असूनही यंदा हवामानाची साथ मिळत नसल्याने यंदाच्या वर्षी उत्पादन विविध कारणांने घटणार आहे.
चिंताजनक : चालू महिन्यात पाऊस : पिकांना धोका ?
दरम्यान, वातारणातील बदलामुळे यंदा गहू या पिकावर तांबेरा या रोगाच्या प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर हरभरावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ही दोन्ही पिके सध्या अंतीम टप्प्यात आलेली असताना त्यांना सुर्यप्रकाशाची गरज आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे त्यांना सुर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

एकूणच शेतकऱ्यांना यंदाच्या वर्षीची परिस्थिती पाहता आर्थिक फटका बसणार आहे. उत्पादन घेण्यासाठीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी गहू आणि हरभरा यांच्या किंमती वाढणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
मोठी बातमी : केळी तेजीत : भाव 4 हजारावर जाण्याची शक्यता !
याशिवाय रब्बीच्या काळातच द्राक्ष, कांदा या पिकांना देखील फटका बसत आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर या पिकांवर औषध फवारणी करण्याच्या अधिकचा खर्च करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या मका, सोयाबीन, टोमॅटो, कांदे या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे रब्बीचे पीक तरी आधार देईल अशी शक्यता असताना ढगाळ वातावरणाचे नवे संकट उभे राहिले आहे.
अर्थसंकल्प 2023-24 : नैसर्गिक शेतीसाठी 1 कोटी शेतकऱ्यांना मिळणार मदत !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1