महाराष्ट्र राज्यात सन 2022-23 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून, या योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नसल्याचे कृषि आयुक्त धीरज कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
खरीप 2022 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिवस 31 जुलै 2022 आहे. शासनाच्या ई-पीक पाहणीमध्ये पीक पेऱ्याची नोंद घेण्याची कार्यवाही 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू होत आहे. पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठीही ई-पीक पाहणीची नोंद आवश्यक असल्याबाबत काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
हे वाचा : ट्रॅक्टर विक्रीमध्ये महिन्यात 15 टक्क्यांनी वाढ
पीक विमा योजनेत भाग घेत असताना काही वेळेस पिकाचा विमा काढलेले पीक व प्रत्यक्ष शेतात असलेले पीक यामध्ये तफावत आढळते. अशा परिस्थितीत शेतकरी पीक विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहतो. शेतकऱ्यांनी शेतात घेतलेले पीक व विमा हप्ता भरताना नोंदवलेले पीक यामध्ये काही तफावत आढळल्यास सदर शेतकऱ्याने पीक पाहणीमध्ये केलेली नोंदही अंतिम गृहित धरण्यात येईल असा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
हे नक्की वाचा : पावसामुळे बांधल्या म्हशी चक्क… बायपासवर
त्यामुळे पीक विमा योजनेत सहभाग घेताना ई-पीक पाहणीमध्ये पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही. सदर शेतकरी स्वयंघोषणापत्राद्वारे पीक विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो मात्र 1 ऑगस्ट 2022 नंतर त्यांनी ई-पीक पाहणीमध्ये आपल्या पिकांची नोंद करावी, असे आवाहन आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.
लक्षवेधी निणर्य : बाजार समितीच्या निवडणुकीत आता शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1