e-peak registration : पीक विम्यासाठी ई-पीक नोंदणी सक्तीची केल्याने शेतकरी मोबाईलवर पीक विम्याची ई-पीक नोंदणी करीत आहेत. मात्र सातत्याने सर्व्हर बंद पडत असल्याने शेतकर्यांच्या आडचणीत वाढ झाली आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यात ई-पीक नोंदणी करताना अनेक अडचणी येत आहेत. ई-पीक नोंदणी सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने ई-पीक नोंदणीचा फज्जा उडाला आहे.
मोठी बातमी : आता पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार पीक विमा
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गेल्या तीन वर्षांपासून महसूल आयुक्तांच्या देखरेखीखाली ‘मोबाइल ॲप’द्वारे जमिनीतील पिकांच्या स्थितीचा निर्णय घेतला जात आहे. ‘प्ले स्टोअर’वर जाऊन वर्जन टू ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून शेतीच्या बांधावर जाऊन प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांना पीकपाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पीकविम्याला लाभ हवा असल्यास ई-पीक नोंदणीवर पिकाची नोंद आवश्यक आहे. त्यामुळे महसूल विभागाने पीक नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जणजागृतीही केली आहे. शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे पीक नोंदणी कशी करावी याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षणही दिले आहे. मात्र ई-पीक नोंदणी सर्व्हर वारंवार बंद पडत आहे. अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाइल नाहीत. त्यामुळे त्यांना इतर लोकांची मदत घ्यावी लागत असली तरीही शेतकरी पीक नोंदणी करण्यासाठी पुढे येत आहेत.
नक्की वाचा : बैलांची संख्या का घटली ?
अनेक गावांत तलाठी, कोतवाल यांच्याकडूनही शेतकऱ्यांना पीक नोंदणी करून दिली जात आहे. परंतु सातत्याने सर्व्हर बंद पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक नोंदणी करता येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक ठिकाणी नेटवर्कचीही अडचणी येत आहेत. बहुतांश वेळी सर्व्हर रात्रीच्या वेळी सुरू होत आहे. ई-पीक नोंदणी ॲपवर गटाचा फोटो आणि अंक्षाश व रेखांश हे आपोआप येतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी पीक नोंदणी कशी होणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
काही डोंगराळ भागातील जिल्ह्यात नेटवर्कची समस्या उद्भवत आहे. काही भागांत बीएसएनएलचे नेटवर्क आहे. मात्र पावसामुळे विविध अडचणी आल्या आहेत. काही ठिकाणी टॉवरवर वीजपुरवठ्याच्या समस्या असल्यामुळे तेथे नेटवर्क नाही. त्यामुळे ग्रामीण डोंगराळ भागातील ई-पीक नोंदणी रखडलेली आहे. अशा अने समस्येमुळे अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची माहिती : खरे हे आहे बैल पोळ्याचे महत्व !
https://www.facebook.com/shetimitramagazine03