गेल्या काही दिवसांत महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या महागाईवर मात करण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. खाद्य तेल कंपन्यांना प्रतिलिटर तेलाचे दहा रुपयांपर्यंत दर कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बुधवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी ही माहिती दिली आहे.
लक्षवेधी बातमी : कृषी विद्यापीठांना ‘माइंडसेट’ बदलण्याची गरज : गडकरी
खाद्यतेलाच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कंपन्यांना कडक निर्देश दिले आहेत. देशभरातील एकाच ब्रँडच्या खाद्यतेलाची एमआरपी समान ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही पांडे यांनी सांगितले. खाद्य तेल कंपन्यांना किरकोळ किमती कमी करण्यास सांगण्यासाठी अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने बुधवारी बैठक घेतली.
महत्त्वाची बातमी : खरीप पीक विमा भरण्याची मुदत 31 जुलैपर्यंत
जगभरात स्वयंपाकाच्या तेलाच्या किमती घसरल्या असतानाही देशात चढा भाव असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती. सरकारने तेल कंपन्यांना जागतिक किमतीतील दर कपातीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत.
सॉल्व्हेंट असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बीव्ही मेहता यांनी म्हटले आहे की, जागतिक स्तरावर किंमत 300-400 डॉलर प्रति टन कमी झाली आहे. पण त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागेल. येत्या काही दिवसांत भारतात खाद्यतेलाच्या किमतीही घसरतील.
मोठी बातमी : दिल्लीत 10 हजार चंदनाची झाडे लावण्याचा नायब राज्यपालांचा फतवा
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1