• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Wednesday, July 23, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

सुशिक्षित युवकांनी नव्या तंत्राचा वापर करून शेती करावी : केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर

शेतीमित्र by शेतीमित्र
November 2, 2022
in शेतीच्या बातम्या
0
सुशिक्षित युवकांनी नव्या तंत्राचा वापर करून शेती करावी : केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर
0
SHARES
0
VIEWS

कृषी क्षेत्रात काळानुरूप बदल करून शेतकऱ्याला संपन्न करण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कृषी क्षेत्रातील जागतिक स्पर्धेत पुढे जाण्यासाठी मुल्यसाखळी वृद्धीच्या माध्यमातून प्रयत्न करावे लागतील, सुशिक्षित युवकांनी नव्या तंत्राचा वापर करून शेती करावी, असे आवाहन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काल पुण्यात केले.

फायद्याची बातमी :  एक रुपयात पीकविम्याचे कवच असा प्रस्ताव केंद्रीय कृषिमंत्र्यांना देणार !

वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत ‘फलोत्पादन पिकांमधील मूल्यसाखळी वृद्धी-क्षमता व संधी’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री तोमर ते बोलत होते. या राष्ट्रीय परिषदेला राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव मनोज आहुजा, अतिरिक्त सचिव डॉ. अभिलक्ष लिखी, राज्याच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, केंद्रीय सहसचिव प्रिय रंजन, केंद्रीय फलोत्पादन आयुक्त प्रभात कुमार, राज्याचे  कृषी आयुक्त धीरज कुमार आदी उपस्थित होते.

ॲग्री स्टार्टअप, कृषी विमा, बाजारपेठेची उपलब्धता आदीद्वारे शेतकऱ्यांना संपन्न करण्याचे प्रयत्न होत असल्याचे सांगून केंद्रीय कृषी मंत्री तोमर म्हणाले, सुशिक्षित युवकांनी नव्या तंत्राचा वापर करून शेती करावी; यासाठी सुविधा देण्यात येत आहेत. याचा परिणाम म्हणून नवी पिढी आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे आकर्षित होत आहे. नैसर्गिक शेतीकडे शेतकरी आकर्षित होत आहेत. कृषी क्षेत्रात नवे प्रयोग करणाऱ्यांना प्रोत्साहन देऊन देशाला कृषी क्षेत्रातील अग्रणी राष्ट्र बनविता येईल.

मोठी बातमी : पंचनाम्यासाठी पैसे मागणाऱ्या त्या कृषी सहायकाचे निलंबन

देश खाद्यान्न उत्पादनात स्वयंपूर्ण झाला असल्याचे सांगून केंद्रीय कृषी मंत्री तोमर पुढे म्हणाले, इतर शेती उत्पादनातही पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर आहोत. देशाला फुलशेती, फलोत्पादन आणि भाजीपाला उत्पादनाच्या क्षेत्रातही चांगली संधी आहे. केंद्र सरकार क्लस्टर कार्यक्रम, शेतकरी उत्पादक संघ (एफपीओ), फलोत्पादन मिशनद्वारे लहान शेतकऱ्यांना एकत्रितपणे काम करून उत्तम गुणवत्तेचे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. यामुळे शेतकऱ्याला दर्जेदार उत्पादन घेणे शक्य होणार असून, उत्पादनाच्या खरेदीसाठी ग्राहक स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचेल, अस विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्रीय कृषी मंत्री तोमर पुढे म्हणाले, आज पारंपरिक खाद्यान्न शेतीसोबत फलोत्पादन, भरडधान्य आणि भाजीपाला उत्पादनावरही लक्ष द्यावे लागेल. भारताच्या प्रयत्नामुळे 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष (मिलेट्स ईअर) म्हणून साजरे होणार आहे. फलोत्पादन आणि प्रक्रिया उद्योगाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासोबत रोजगार निर्मितीही होईल. हे करताना शेतकऱ्याला अधिक लाभ होईल याचा विचार या साखळीतील इतर घटकांनी करायला हवा. आर्थिक प्रतिकुलतेतही कृषी क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे कार्य करीत असल्याने त्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. असेही तोमर यावेळी म्हणाले.

हे वाचा : सणसर येथे उद्या ‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद  

ग्रामीण क्षेत्र देशाचा आत्मा असल्याचे सांगून, केंद्रीय कृषी मंत्री तोमर म्हणाले, शहरासोबत देशातील ग्रामीण भाग स्वच्छ आणि संपन्न होणे गरजेचे आहे. गाव स्वावलंबी झाल्यास देश स्वावलंबी होईल. यादृष्टीने कृषी क्षेत्रात कार्य करणारा शेतकरी उपजीविकेसोबत देशाच्या प्रगतीत योगदान देता येते. कृषी क्षेत्र अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशाच्या समृद्धीसाठी क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करावे लागेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी विविध योजना : अब्दुल सत्तार

राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार याप्रसंगी बोलताना म्हणाले, आज शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची गरज आहे. नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना समृद्धीकडे नेता येईल. द्राक्ष उत्पादनात तंत्रज्ञानाचा उपयोगाचा चांगला उपयोग होत असून देशाला 2 हजार 300 कोटी रुपयांपेक्षा अधिक विदेशी चलन राज्यातील द्राक्ष निर्यातीच्या माध्यमातून मिळते. एक दिवस शेतकऱ्यांसाठी उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुकूल धोरण आणि योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत आहे. शेतकरी संपन्न झाल्यास तो देशाच्या प्रगतीत योगदान देऊ शकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी चांगली कामगिरी करणाऱ्या कृषि क्षेत्रातील नवउद्यमी (स्टार्टअप्स), कृषि उत्पादक संस्था, मूल्य साखळी, बँक प्रतिनिधी, एसएचएम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते ‘ऑरगॅनिक पॅकेज ऑफ प्रॅक्टिस फॉर हॉर्टीकल्चर क्रॉप्स’ आणि ‘मिशन ऑरगॅनिक व्हॅल्यू चेन’ या पुस्तिकांचे आणि फलोत्पादन क्षेत्रातील यशकथांच्या संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

ब्रेकिंग : बुधवारी मी राजीनामा देईन ! ; कृषीमंत्र्यांचे खळबळजणक विधान

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Tags: Encouraging new experimenters in the field of agricultureNational Conference on Value Chain Growth-Capacity and Opportunities concluded in Pune.Rural areas are the soul of the country.The country is self-sufficient in food production.Various schemes to empower farmers : Abdul Sattarकृषी क्षेत्रात नवे प्रयोग करणाऱ्यांना प्रोत्साहनग्रामीण क्षेत्र देशाचा आत्मा आहे.देश खाद्यान्न उत्पादनात स्वयंपूर्ण.मूल्यसाखळी वृद्धी-क्षमता व संधी राष्ट्रीय परिषद पुण्यात संपन्नशेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध
Previous Post

एक रुपयात पीकविम्याचे कवच असा प्रस्ताव केंद्रीय कृषिमंत्र्यांना देणार !

Next Post

स्वतंत्र कृषि निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र पाहिले राज्य : संदिपान भुमरे

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
स्वतंत्र कृषि निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र पाहिले राज्य : संदिपान भुमरे

स्वतंत्र कृषि निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र पाहिले राज्य : संदिपान भुमरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

231627
Users Today : 15
Users Last 30 days : 741
Users This Month : 583
Users This Year : 5957
Total Users : 231627
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us