शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावाने झालेले सोयाबीनचे नुकसान पीक विम्याच्या नियमात कसे बसवता येईल आणि अधिकाधिक मदत कशी देता येईल, याबाबत शासन प्रयत्नशील असल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना सांगितले. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील एरंडी आणि जय नगर येथील शिवरातील प्रादुर्भाव झालेल्या शेतीची त्यांनी पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.
ब्रेकिंग न्यूज : जिल्हा बँका राज्य बँकेत विलीनीकरणाच्या हालचाली ?
शंखी गोगलगाय प्रादुर्भावावर अभ्यास समिती स्थापन केली असून, ती लवकरच याबाबत निर्णय देईल असे सांगून, कृषीमंत्री सत्तार म्हणाले, शंखी गोगलगाय अंकुर फुटल्यापासून एक फुटापर्यंतच्या वाढीपर्यंतचे सोयाबीन पीक नष्ट करते. यावर कीटकनाशक फवारले तर पक्षाच्या जीवासाठी धोक्याचे आहे. त्यामुळे यावर अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ती लवकरच यावर उपाययोजनेसाठी योग्य तो निर्णय देईल. हे एनडीआरएफ च्या कक्षेत बसत नसले तरी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मोठी बातमी : अतिवृष्टीच्या नुकसानीबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय : कृषिमंत्री सत्तार
यावेळी त्यांच्या समवेत माजी मंत्री आ. संजय बनसोडे, औसा येथील आमदार अभिमन्यू पवार, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेकर, कृषी विभागाचे सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, विभागीय जिल्हा कृषी अधिकारी रविंद्र पाटील उपस्थित होते.
महत्त्वाची बातमी : यंदा राज्यात 4 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के अधिक पाऊस

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1












Users Today : 16
Users Last 30 days : 769
Users This Month : 94
Users This Year : 806
Total Users : 236255