राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात 30 जूननंतर होणाऱ्या संस्थांच्या निवडणुका आता 30 सप्टेंबरनंतर होणार आहेत.
नक्की वाचा : टोमॅटो 120 रुपये किलोवर ?
सहकार मंत्री अतुल सावे यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 42 हजार 157 संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून, 6 हजार 510 संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु आहेत.
पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक ठिकाणी निवडणूक घेणे कठीण आहे. शिवाय शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याने मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ज्या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे, अशा संस्थांचे निवडणूक कामकाज पूर्णपणे पावसाळ्यात होणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण होऊ शकते. याच कारणांमुळे निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
नवी योजना : शेतकऱ्यांसाठी पीएम-प्रणाम योजनेची घोषणा
राज्यात 82 हजार 631 सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. त्यापैकी 49,333 सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या असून, 48 हजार 667 संस्थांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. राज्यातील 42 हजार 157 संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून 6 हजार 510 संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु आहेत.

राज्यात 30 जूननंतर पर्जन्यमानाचे स्वरूप जास्त असल्याने उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती, पावसामुळे जनजीवन आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता, अशात जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीत सहभागी होता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे हजारो सहकारी आणि गृहनिर्माण संस्थांच्या लाखो पदाधिकारी आणि मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आनंदाची बातमी : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या दुसरा टप्प्याला मान्यता

https://www.facebook.com/shetimitramagazine03