राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची चर्चा होत असतानाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकांचे बिगुल वाजले आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून 31 डिसेंबर अखेरपर्यंत पात्र असलेल्या 281 बाजार समित्यांची निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
महा ब्रेकिंग न्यूज : वीज दरात पुन्हा वाढ होणार : शिंदे सरकारचा झटका
सरकारच्या बदलत्या धोरणानुसार यंदा सभापतींची निवड होणार असल्याने या निवडणूकांना मिनी विधानसभा निवडणूकांचे स्वरुप येणार असल्याचे चित्र आहे. तर कोर्टाच्या निर्देशानुसार राज्यातील 6 बाजार समित्यांची निवडणूक ही 18 व 19 डिसेंबरलाच होणार आहे.
स्थानिक पातळीवर बाजार समितीमध्ये वर्चस्व कुणाचे यावरुनही राजकीय भूमिका ठरते. त्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणूकांना महत्व प्राप्त झाले आहे. या नववर्षाच्या सुरवातीला राज्यातील 281 बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशी थेट संबंधित असलेल्या या संस्थावर आपले वर्चस्व असावे असा प्रत्येक पक्षाचा निर्धार राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या होऊ घातलेल्या निवडणूकांमध्ये चूरस निर्माण होणार आहे.
महत्त्वाच्या टिप्स : जनावरांमधील घातक लम्पी स्कीन रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेला डिसेंबरपासून सुरवात होणार आहे. असे असले तरी 281 बाजार समित्यांची निवडणूक ही 17 जानेवारी रोजी तर उर्वरित 6 बाजार समित्यांची निवडणूक ही 18 व 19 डिसेंबरला होणार आहे. कोर्टाने तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त जगदीश पाटील यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
थेट शेतकऱ्यांमधून सभापतीची निवड असा निर्णय घेतला होता. पण यावर एका शेतकऱ्याने याचिका दाखल केली होती. त्यानुसार आता बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून यावरच निवडणूका थेट शेतकऱ्यांमधून की सभासदांमधून हे स्पष्ट होणार असे बाजार समितीचे अध्यक्ष ललीतभाई शाह यांनी सांगितले आहे.
ब्रेकिंग : जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा 12 जिल्ह्यात फैलाव
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1