सध्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल-डिझेल बरोबर गॅसच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्याने महागाई वाढीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली असताना पुन्हा वीजेच्या दरात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसापूर्वी स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकार लवकरच असा निर्णय घेणार असल्याचे समजते.
महत्त्वाच्या टिप्स : जनावरांमधील घातक लम्पी स्कीन रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना
राज्यात वीज दरात वाढ झाली तर पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ पोहचणार आहे. देशात अगोदरच महागाईने तोंड वर काढले आहे. देशात अगोदरच महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किमती खूप वाढल्या आहेत. त्यामुळे अगोदरच सर्वसामान्य नागरिक दरवाढीमुळे हैराण झाले आहेत. त्यातच आता शिंदे सरकार पुन्हा वीज दर वाढवून सर्वसामान्यांच्या खिशावर बोजा टाकण्याच्या तयारीत आहे.

राज्यात विजेच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने आधीच घेतला आहे. आता नोव्हेंबर महिन्यात पुन्हा दरवाढ होणार आहे. वीजेच्या इंधन समायोजन शुल्काच्या पुन्हा एकदा 60 ते 70 पैशांची वाढ होण्याची शक्यता आहे. वीज खरेदी खर्चातील वाढीपोटी महावितरणने 1500 कोटी रुपये राखीव ठेवले होते. तो निधी 2021 मध्येच संपला आहे. त्यामुळे महावितरणने 1 एप्रिल 2022 मध्ये खरेदीच्या वाढीपोटी इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली. सध्या हे शुल्क 1.30 रुपये प्रति युनिट इतके आहे.
ब्रेकिंग : जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा 12 जिल्ह्यात फैलाव
आता पुढील महिन्यात महावितरण 60 ते 70 पैशांची वाढ करणार आहे. त्यामुळे इंधन शुल्कचा दर हा 2 रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. महानिर्मितीकडून वीज खरेदी दरात वाढ झाल्यामुळे इंधन समायोजन शुल्कावर त्याचे परिणाम झाले आहे, मात्र तूर्तास अशी ही दरवाढ होणार नाही, सध्याचे इंधन समायोजन शुल्क नोव्हेंबरपर्यंत लागू होणार आहे, अशी माहिती महावितरणचे वाणिज्य संचालक डॉ. मुरहरी केळे यांनी दिली आहे.

ब्रेकिंग : यंदा ऊस गाळप 15 दिवस आधी सुरु होण्याची शक्यता ?

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1