कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने खरीप पिकांच्या उत्पादनाचा प्राथमिक अंदाज जाहीर केला आहे. 2022-23 च्या खरीप हंगामात 149.92 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये मका आणि ऊसाच्या विक्रमी उत्पादनाचा अंदाज मंत्रालयाने वर्तवला आहे.
महत्त्वाची बातमी : धान व भरडधान्य खरेदी आराखड्यास केंद्राची मान्यता
शेतकऱ्यांची मेहनत, शास्त्रज्ञांची प्रगल्भता आणि शेतकरी हिताची सरकारची धोरणे यामुळे कृषी क्षेत्राचा दिवसेंदिवस विकास होत असल्याचे मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे.
2022-23 साठी प्रमुख खरीप पिकांमध्ये तांदूळ (104.99 दशलक्ष टन), भरड तृणधान्ये (36.56 दशलक्ष टन), मका (23.10 दशलक्ष टन, विक्रमी उत्पादन), डाळी (8.37 दशलक्ष टन), तूर (3.89 दशलक्ष टन), तेलबिया (23.57 दशलक्ष टन), भुईमूग (8.37 दशलक्ष टन), सोयाबीन (12.89 दशलक्ष टन), कापूस (34.19 दशलक्ष गाठी, प्रत्येकी 170 किलो), ज्यूट आणि मेस्टा (10.09 दशलक्ष गाठी, प्रत्येकी 180 किलो), ऊस (465.05 दशलक्ष टन, विक्रमी उत्पादन) असे अंदाजे उत्पादन होईल, असा प्राथमिक अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये मका आणि ऊसाच्या विक्रमी उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे.
2022-23 च्या पहिल्या हंगामी अंदाजानुसार (फक्त खरीप), देशात एकूण अन्नधान्य उत्पादन 149.92 दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे. तो मागील पाच वर्षांच्या (2016-17 ते 2020-21) सरासरी अन्नधान्य उत्पादनापेक्षा 6.98 दशलक्ष टन अधिक आहे.
हे वाचा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रा. डॉ. शरद गडाख
2022-23 मध्ये खरीप तांदळाचे एकूण उत्पादन 104.99 दशलक्ष टन अंदाजित आहे. मागील पाच वर्षांचे (2016-17 ते 2020-21) सरासरी उत्पादन 100.59 दशलक्ष टन होते. त्यापेक्षा ते 4.40 दशलक्ष टनांनी जास्त आहे. 2022-23 मध्ये देशात मक्याचे उत्पादन विक्रमी 23.10 दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे. सरासरी 19.89 दशलक्ष टन उत्पादनापेक्षा तो 3.21 दशलक्ष टन अधिक आहे. तर खरीप पोषक/ भरड तृणधान्यांचे उत्पादन अंदाजे 36.56 दशलक्ष टन आहे जे सरासरी 33.64 दशलक्ष टन उत्पादनापेक्षा 2.92 दशलक्ष टन अधिक आहे. 2022-23 मध्ये एकूण खरीप डाळ उत्पादन 8.37 दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे.
2022-23 मध्ये देशातील एकूण खरीप तेलबियांचे उत्पादन 23.57 दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे. जे सरासरीपेक्षा 1.74 दशलक्ष टन अधिक आहे. 2022-23 मध्ये देशातील उसाचे एकूण उत्पादन 465.05 दशलक्ष टन इतके विक्रमी असल्याचा अंदाज आहे. 2022-23 मधील ऊसाचे 373.46 दशलक्ष टन ऊस उत्पादन सरासरीपेक्षा 91.59 दशलक्ष टनांनी जास्त आहे. कापसाचे उत्पादन अंदाजे 34.19 दशलक्ष गाठी (प्रत्येकी 170 किलो) आणि ताग आणि मेस्ताचे उत्पादन अंदाजे 10.09 दशलक्ष गाठी (प्रत्येकी 180 किलो) आहे.
ब्रेकिंग : यंदाचा ऊस गाळप हंगाम या तारखेपासून सुरु !
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1