सध्या वेगवेगळ्या योजनेअंतर्गत इथेनॉल प्रकल्पांना परवानगी देण्यात येत आहे. हा परवानगी देण्याचा कार्यक्रम केंद्र सरकारकडून वेगात सुरू आहे. त्यामुळे इथेनॉल देखील वाढत असून, देशाची इथेनॉल क्षमता सध्याच्या क्षमतेपेक्षा 25 टक्क्यांनी वाढून 1250 कोटी लिटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
नवे तंत्र : जाणून घ्या ! हायड्रोपोनिक्स चारा निर्मितीचे तंत्र
केंद्रीय खाद्य आणि सार्वजनिक मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 20 टक्के इथेनॉल मिश्रण करण्यासाठी आणखी काही प्रकल्पांना मंजुरी देण्याचे काम वेगात सुरू आहे.
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण 2013-14 मध्ये 1.53 टक्के होते. ते 2022 पर्यंत 10.17 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. 2025-26 ते 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य आहे. इथेनॉलवरील जीएसटी 18 टक्क्यावरून 5 टक्के करण्यात आल्याने याचाही फायदा इथेनॉल निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांना होत आहे.
ब्रेकिंग : … तर भविष्यात मातीही नष्ट होईल : पद्मश्री राहिबाई पोपेरे
दरम्यान, या सर्व गोष्टीचा विचार केल्यास केंद्र शासन इथून पुढील काळातही या प्रकल्पांना सातत्याने मंजुरी देण्याची भूमिका घेऊ शकते, असे सूत्रांकडून समजते. आतापर्यंत 281 प्रकल्पांना केंद्राने मान्यता दिली असून, पंधरा दिवसाला पाच ते दहा इथेनॉल प्रकल्पांना तत्त्वतः मान्यता देण्याचे काम वेगात सुरू आहे. सध्या धान्यावर आधारित इथेनॉल प्रकल्पाची क्षमता 336 कोटी लिटर आहे. यामध्ये सातत्याने वाढ होत असून, लवकरच देशाची इथेनॉल क्षमता सध्याच्या क्षमतेपेक्षा 25 टक्क्यांनी वाढून 1250 कोटी लिटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
खूशखबर : आता रोबो करणार पिकाची आरोग्य तपासणी : म्हसवड तालुक्यात प्रात्येक्षीक
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1