तुपकर यांचा उद्या आत्मदहनाचा इशारा
पीकविमा, अतिवृष्टीची रखडलेली मदत आणि सोयाबीन-कापूस दरवाढ या मुद्यांसाठी रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसह दि. 11 (शनिवारी) रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला असून, बुलडाणा शहर पोलिसांनी मात्र हे आंदोलन करू नये, म्हणून त्यांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, आपण आरपारची लढाई लढण्यासाठी तयार असून आता शहीद झालो तरी माघार नाही, असे तुपकरांनी फेसबुक लाइव्ह येत स्पष्ट केले आहे.
चिंताजनक : यंदा यामुळे घटणार गहू आणि हरभऱ्याचे उत्पादन !
रविकांत तुपकर यांनी या वर्षी कापूस, सोयाबीन दरवाढ व इतर मुद्यांवर सप्टेंबर महिन्यापासून आंदोलन सुरू केले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. शिवय त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत चर्चाही केली आहे. मात्र केंद्र व राज्य सरकारकडून अपेक्षित काहीही घडले नसल्याने अखेरीस या मुद्यांवर कायमचा तोडगा काढण्यासाठी आपण आता आत्मदहन करू, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

तुपकर यांनी पीकविमा, अतिवृष्टीची रखडलेली मदत आणि सोयाबीन-कापूस दरवाढ या मुद्यांसाठी आत्मदहन आंदोलन करण्याची घोषणा मंगळवारी (दि. 7) केली असून, त्यानंतर ते भूमिगत झाले आहेत. त्यामुळे बुलडाणा शहर पोलिसांची पळापळ सुरू झाली आहे.
खूशखबर : यंदा द्राक्षाच्या विक्रमी निर्यातिची शक्यता
आपल्या विविध मागण्यासाठी तुपकर यांनी शनिवार दि. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा भारतीय कृषी विमा कंपनी लि. (एआयसी) पीकविमा कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मुंबई येथील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, तुपकर यांनी आंदोलन करू नये यासाठी पोलिसांनी त्यांना नोटीस सुद्धा बजावली आहे. मात्र आपण आता माघार घेणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

तुपकर आपल्या आत्मदहनाच्या भूमिकेवर ठाम असून, त्यांनी फेसबुक लाइव्ह येत आपण आरपारची लढाई लढण्यासाठी तयार असून, आता शहीद झालो तरी माघार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उद्या काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चिंताजनक : चालू महिन्यात पाऊस : पिकांना धोका ?

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1