राज्य सरकारने केंद्राकडे केलेली पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदतवाढ मान्य करण्यात आली असून, पीक विमा भरण्यासाठी 15 जुलैपर्यंत असलेली मुदत आता 23 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.
यासंदर्भात. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सुचविल्यानुसार राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी यासंदर्भात केंद्राकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविला होता. त्या प्रस्तावाला मान्यात मिळाली असून आठ दिवसाची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे आता 23 जुलैपर्यंत पीक विमा भरता येणार आहे.
46 लाख शेतकऱ्यांचा सहभाग
कृषीमंत्री दादा भुसे यांनी पीक विमा योजनेसाठी 15 जुलैपर्यंत सुमारे 46 लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत असे सांगितले. राज्यातील काही भागात लांबलेला पाऊस, कोरोना प्रतिबंधासाठी असलेले निर्बंध यामुळे शेतकऱ्यांना मुदतीत विमा हप्ता भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता यावे यासाठी सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाने २३ जुलै पर्यंत योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राज्यानं केंद्राकडं केली होती.
योजनेची वैशिष्ट्ये
पंतप्रधान पीक विमा योजना ही सर्व शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक योजना आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार यामध्ये सहभागी होऊ शकतात. शेतकऱ्यांनी खरिप हंगामातील पिकांच्या विमा संरक्षित रकमेच्या 2 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे हा उद्देश आहे. पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. खरिपातील सर्व पिकांसाठी जोखीम स्तर 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे.
नुकसान भरपाईची कारणे
खरिप हंगामात पेरणी केल्यापासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, जमीन जलमय होणे, भुस्खलन होणे, पावसातील खंड, कीड, रोग यामुळे उत्पादनात आलेली घट, हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्याने होणारे नुकसान याची जोखीम योजनेत घेतली जाते. खरिप हंगामातील हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचं होणारं नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचं काढणीनंतर होणारं नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं पिकांच नुकसानं याची जोखीम पीक विमा योजनेत घेतली जाते.
पीकनिहाय विमा हप्ता रक्कम
भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 33 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल. भात पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 660 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.
ज्वारी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 16 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल. ज्वारी पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 320 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.
भुईमुग पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 31500 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल.भुईमुग पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 630 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.
सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 26 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल. सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 520 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.
मुग आणि उडीद पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल. मुग आणि उडीद पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 400 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.
विमा हप्त्याची रक्कम कुठे भरायची
शेतकरी त्यांचे खाते असलेल्या बँकेच्या शाखात, प्राथमिक कृषी पतपुरठाव संस्थात, पीक विमा पोर्टल आणि आपले सरकार सुविधा केंद्र या ठिकाणी पीक विम्याचा हप्ता भरु शकतात.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा