यंदा राज्यात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटकाबसलेल्या नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या रकमेत वाढ करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यात लक्षवेधी मोर्चे काढण्यात आले. युवा सेनेच्या वतीने बिलोली तहसील कार्यालयावर ट्रॉक्टर मोर्चा काढण्यात आला तर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर छावा संघटनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा मराठावाड्यातील नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे. जिल्ह्यातील 93 पैकी 80 महसूल मंडळात सातत्याने तीन वेळा अतिवृष्टी झाली, त्यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिके पाण्यात गेली. अनेक ठिकाणी जमिनी खरडून गेल्याने शेतजमिनीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
स्थानिक पातळीवरील पंचनामे आणि नुकसानभरापाईचे निकष हे पायदळी तुडवले जात आहे. पावसामुळे जे नुकसान झाले आहे त्याची तर भरपाई मिळावीच पण शेतशाकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा देखील प्रश्न मार्गी लागावा, यासाठी आखिल भारतीय छावा संघटना आता आक्रमक झाली आहे. संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे यांच्या उपस्थितीमध्ये नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला.
राज्य सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून, त्यातून शेतकऱ्यांचे काहीही नुकसान भरून निघणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळाली नाहीतर मात्र, शेतकऱ्यांना घेऊन मंत्रालयातच घुसणार असल्याचा इशारा जावळे यांनी दिला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तहसील कार्यालयावर युवा सेनेच्या वतीने युवासेना जिल्हा प्रमुख बालाजी पाटील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर मोर्चा मोर्चा काढण्यात आला. 50 ते 60 ट्रॅक्टरसह हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.
बिलोली तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी, नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे, पडझड झालेल्या घराचे पंचनामे करुन तत्काळ मदत देण्यात यावी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर करावी. यासह अन्य मागण्या यावेळी युवा सेनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
👇 शेतीमित्र मासिकाचे फेसबुक पेज लाईक करा 👇
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 शेतीमित्र मासिकाचे इन्ट्राग्राम पेज जॉईन करा 👇
https://www.instagram.com/shetimitra03/
👇 शेतीमित्रच्या टेलीग्राम ग्रुपमध्ये सहभागी व्हा ! 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्क्लिटारवर क्लिक करा
👇 👇 👇