महाराष्ट्र कांदा, कापूस, ऊस, यासह अन्य उत्पादनाच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. राज्यात शेतीपुरक वातावरण असल्याने शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून विविध सुविधा आणि मोफत योजना राबवल्या जातात. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील खरीप हगांमाबाबत आढावा बैठक घेतली यामध्ये भारतात महाराष्ट्र हे शेतकरी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे दहा वाण मोफत देणार आहे.
महत्त्वाची बातमी : राज्यात अद्यापी 17.5 लाख टन ऊस शिल्लक
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकरी बांधवांच्या आरोग्याचा विचार करणारे महाराष्ट्र देशातले पहिले राज्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. राज्य शासनाने विकासाची पंचसूत्री स्वीकारली असून, कृषी क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे आवाहन करत यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

धक्कादायक बातमी : कोकणातील हापुसला फळमाशीचा डंख : 60 टक्के आंबा बाधित
शेतकरी बांधव आपल्या कुटुंबातले घटक आहेत. त्यामुळे यंत्रणेने आपुलकीने कुटुंबासारखे काम करावे. ‘विकेल ते पिकेल’ अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले पाहिजे. रोग, कीडींचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी सतर्कता बाळगली पाहिजे. शेतमालाला हमी भाव आहे, पण हमखास भाव मिळाला पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हे नक्की वाचा : राज्य सरकारने 8 हजार कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातले : फडणवीसांचा आरोप
खरीप हंगाम २०२२ मध्ये, प्रमुख अन्न पिकांचे १५१.३३ लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असणे अपेक्षित आहे. खरीप हंगामात खरुजचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत. हवामान खात्यानुसार यंदा पुरेसा पाऊस पडेल. मात्र, पुरेसा पाऊस होईपर्यंत पेरणी करू नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केले.
ब्रेकिंग न्यूज : पेट्रोल 9.50 तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1