आमचे सरकार महाराष्ट्र राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करणार आसून, यासाठी आम्हाला विरोधकांचे सहकार्य आपेक्षीत आहे. यासाठी आम्ही हातात हात घालून काम करू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच त्यांच्या बांधावर जाऊन विचारपूस केली जाते. त्याच्या जीवनात सुख समृद्धीचे क्षण यावेत यासाठी सरकार सर्वकाही करेल. आमचे सरकार शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

विश्वास ठरावावरील अभिनंदन प्रस्तावावर आभार व्यक्त करताना शिंदे यांनी बंडखोरी आणि अन्य घडामोडींचा ऊहापोह केला. तसेच पुढील मंत्रिमंडळ बैठकीत इंधनावरील व्हॅट कमी करून सामान्य जनतेला दिलासा देण्याचे अश्वासन देवून त्यांनी हिरकणीवाडीसाठी 21 कोटींच्या निधीची घोषणा केली.
मी कालही शिवसेनेत होतो आणि आजही शिवसेनेत आहे. असे सांगून, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही शिवसेनेतून फुटल्याने परत निवडून येणार नाही, असा दावा केला जात आहे. मात्र, येत्या निवडणुकीत फडणवीस आणि मी दोघे मिळून २०० जागा निवडून आणू.

जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय कर कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर देशातील काही राज्यांनी काही प्रमाणात व्हॅट कमी केला होता. मात्र, आपल्या राज्याने एक पैशाचाही व्हॅट कमी केला नाही परंतु, राज्यात नव्याने अस्तित्वात आलेले युतीचे सरकार लवकरच यावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेईल, असेही शिंदे यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांचे आणि माझे चांगले जुळते आसे सांगून मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, आम्हाला बंडखोर म्हटले गेले, त्यानंतर डुक्कर काय, प्रेत काय आणि काय काय बोललं गेले. तरीही आम्ही शांत राहिलो. माझ्याकडे आमदार येऊन रडायचे. माझ्याकडे लोक त्यांची व्यथा सांगायचे. माझ्याकडून जेवढी मदत करता येईल, तेवढी मदत मी करत होतो. सगळ्यांना वाटत होते की भाजपचा मुख्यमंत्री होईल. मात्र तसे झाले नाही, देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि मला मुख्यमंत्री केले असे त्यांनी यावेळी सांगितले.
👇 शेतीमित्र मासिकाचे फेसबुक पेज लाईक करा 👇
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 शेतीमित्र मासिकाचे इन्ट्राग्राम पेज जॉईन करा 👇
https://www.instagram.com/shetimitra03/
👇 शेतीमित्रच्या टेलीग्राम ग्रुपमध्ये सहभागी व्हा ! 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा
👇 👇 👇