केंद्रीय मंत्रिमंडळाने एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला असून, फॉस्फरस व पोटॅश खतांवर अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे खताच्या किमती स्वस्त होणार असून, केंद्र सरकारने फॉस्फरस आणि पोटॅश खतांच्या नवीन दरांना मंजुरी दिली आहे.
हे नक्की वाचा : कष्टकरी, शेतकऱ्यांवरील संकटे दूर कर ! : उपमुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठलचरणी साकडे
सध्या खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. हे नवीन अनुदान दर रब्बी हंगाम 2022-23 साठी आहेत. हे नवीन दर 1 ऑक्टोबर 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत रहाणार आहेत. या निर्णयानंतर आता शेतकऱ्यांना कमी दरात खते मिळणार आहेत. शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना रब्बी 2022-23 मध्ये सर्व फॉस्फेट खते आणि पोटॅश खते कमी दरात मिळू शकतील.

शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून आता फॉस्फरस 66.93 रुपये प्रति किलो, नायट्रोजन 98.02 रुपये प्रति किलो, सल्फर 6.12 रुपये प्रति किलो तर पोटॅश 23.65 रुपये प्रति किलो असे खतांचे नवीन दर असणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे.
ब्रेकिंग : ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकारची टाळाटाळ का ?
त्यामुळे खत कंपन्याही ठरलेल्या दरांनुसार अनुदानित किमतीत शेतकऱ्यांना खते पुरवावे लागणार आहेत. यामुळे आता मोदी सरकार खत उत्पादकांमार्फत शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात फॉस्फेट आणि पोटॅशसाठी युरिया आणि 25 दर्जाची खते देत आहे. फॉस्फेट आणि पोटॅश खतांवरील अनुदान योजना 1 एप्रिल 2015 पासून नियंत्रित केली जात आहे. यामुळे शेतीचा उत्पादन खर्च कमी होणार असून शेतकऱ्यांना चार पैसे शिल्लक राहणार आहेत.

मोठी घोषणा : लवकरच शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळेल : उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1