रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम हळूहळू भारतातील अनेक क्षेत्रावर पडू लागला आहे. सुरवातीला तेल महागाईचा फटका देशाला बसला तर आता शेतीशी निगडित खत पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे युद्ध काही काळ असेच सुरू राहिले तर खताच्या किमती दुप्पट होतील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शिवाय या दोन्ही देशांशी संबंधित आयात आणि निर्यातीला सुद्धा मोठा धक्का बसेल असा देखील अंदाज व्यक्त होत आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे खताच्या जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम दिसून येत आसून हा बाजार अस्थिर झाला आहे. येत्या काळात शेती क्षेत्रात मोठी खळबळ उडणार असल्याचे दिसत आहे. शिवाय त्याचा खत पुरवठ्यावर परिणाम होऊन दरवाढीचे संकेत दिले जात आहेत. भारत काही खतांची मोठ्या प्रमाणात आयात करतो. याबाबत अर्थमंत्री चिंता व्यक्त करत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे खत कंपन्या देखील अस्वस्थ होऊ लागल्या आहेत.
भारत देशात सुर्यफूल आणि खताची मोठ्या आयात रुस आणि युक्रेन येथून केली जाते. देशातील शेती क्षेत्राचा विचार करता आपल्याला लाखो टन खताची आयात करावी लागते. शिवाय रशियातील बेलारुस येथून जवळपास 20 टक्के आयात केली जाते. याबाबत आपल्या देशाने रशियाबरोबर नुकतेच दीर्घकालीन केलेले आहेत. त्यामुळे दरवर्षी जवळपास 20 लाख टन आयात करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले होते. मात्र युद्धामुळे या आयातीला फटका बसत असून युद्ध परिस्थिती जैसे थे राहिल्यास देशात खताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
भारतासह अनेक देश हे खतांसाठी रशियावर अवलंबून आहेत. चीन आणि ब्राझील या देशाला देखील रशियातून खत पुरवठा होतो. खत निर्मितीत रशिया पहिल्या पाच देशांच्या रांगेत आहे. रशियातून सध्या काही अंशी आयात सुरु असल्याचे सांगण्यात येत असले तरी युद्ध परिस्थिती लवकर आटोक्यात न आल्यास सध्या सुरू असलेली आयात पूर्णत: बंद होण्याचा धोकाही संभवत आहे. त्यामुळे खताच्या बाबतीत देशाची परिस्थिती बिघडणार आहे. त्यामुळेच खताच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढतील असा अंदाज व्यक्त होत आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
शेतीचा वीजपुरवठा खंडित करण्याचा ऊर्जामंत्र्यांचा इशारा
आजपासून गाईच्या दुधाला मिळणार 30 रुपये खरेदी दर !
एका रात्रीतून कांद्याचे दर घसले !
रशियाकडून होत असलेल्या खताच्या निश्चित पुरवठ्या एवढा पुरवठा इतर देशाकडून होईल याची शाश्वती खत कंपन्यांना वाटत नाही. शिवाय युरोपीय देशांनी रशियावर बंधने घातली असल्याने खत उपलब्धतेत आणखी अडचणी येऊ शकतात. ही युद्धजन्य परिस्थती अशीच राहिल्यास कच्च्या मालाच्या किमती वाढण्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने नक्कीच खतांच्या किमती वाढणार असे दिसत आहे. तर खत दरवाढ झाल्यास केंद्र सरकारला अनुदान देखील वाढवून द्यावे लागू शकते. यामुळे येणाऱ्या काळात ही एक मोठी डोकेदुखी होऊ शकते, असाही अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला जात आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇