कोल्हापूर येथील द्राक्ष महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत असून या महोत्सवात रेसिड्यू फ्री द्राक्षाबरोबर विविध वाणांची द्राक्ष ग्राहकांना आकर्षित केले आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या योजनेसंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर व कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूरातील शाहू स्मारक भवनात द्राक्ष महोत्सव सुरू आहे. याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सांगली जिल्ह्यातील सुमारे 18 हून अधिक प्रयोगशील द्राक्ष बागायतदार या द्राक्ष महोत्सवात सहभागी झाले आहेत. द्राक्ष उत्पादक शेतकर्यांकडे विविध वाणांची व विविध चवींची द्राक्षे उपलब्ध आहेत. मात्र ते ग्राहकांपर्यंत पोहचणे गरजेचे असल्याने आणि गेल्या काही महिन्यांपासून द्राक्ष उत्पादक संकटात होते; त्यांना दिलासा देण्यासाठी पणन मंडळाच्या वतीने आणि सांगली बाजार समितीच्या सहकार्यातून द्राक्ष महोत्सव हे विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या महोत्सवात शेतकरी व ग्राहक यांच्यात थेट संवाद सुरू आहे. शिवाय खरेदी-विक्री बरोबरच द्राक्षाच्या व्यवस्थापनाबाबातच्या माहितीची देवाण-घेवाण होत आहे. द्राक्ष उत्पादनाबाबात चिकित्सक गोष्टीही ग्राहकांकडून विचारल्या जात आहेत. विशेषत: या मोहोत्सवात अनेक तरुण द्राक्ष बागायतदार सहभागी झाले आहेत. द्राक्षामधील काही फळांच्या चवीनी नवी अनुभूती देणारे वाण तसेच द्राक्षापासून पहिल्यांच बनवण्यात आलेले जॅम ग्राहकांची पसंती मिळवित आहेत. बाजारात महाग मिळणारी द्राक्ष इथे अगदी माफक दरात उपलब्ध होत असल्याने ग्राहकांची गर्दी वाढत आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
येणाऱ्यां हंगामासाठी खताचे अत्ताच नियोजन करा : कृषीमंत्री दादाजी भुसे
आजपासून तीन दिवस या जिल्ह्यात पडणार पाऊस हवामान खात्याचा अंदाज
विकास आणि पर्यावरण हातात हात घालूनही पुढे जाऊ शकतात : आदित्य ठाकरे
श्री दत्त कारखान्यात झाले शुगर बीटचे गाळप !
जीआय मिळालेल्या फळामधील वाढत्या बनवेगिरीला आळा घालणार ?
या महोत्सवात क्रीमसन, ज्योती, रेडग्लोब, सुपर सोनाक्का, माणिकचमण, कृष्णा सीडलेस, आर.के सुपर, शरद सीडलेस, जम्बो द्राक्षे उपलब्ध आहेत. गेल्या तीन दिवसात पाच लाखाहून अधिक किमतीचे द्राक्षे विकली गेली आहेत. ग्राहकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन पणन मंडळाचे कोल्हापूर विभागाचे उपसरव्यवस्थापन डॉ. सुभाष घुले यांनी केले आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
👇 शेतीमित्रचा online shetimitra हा टेलेग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇