भारतीय शेतीच्या उन्नतीसाठी मोदी सरकार कटिबद्ध असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच देशातील शेतकरी आणि शास्त्रज्ञांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, यासाठी कृषी मालाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी केले.

दिल्ली येथील आयसीएआर सोसायटीच्या 93 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना तोमर म्हणाले की, कृषी उत्पादनांच्या चांगल्या गुणवत्तेची खात्री करणे ही नेहमीच चिंतेचा विषय ठरला असल्याचे सांगून आहे. त्यांनी यावेळी देशातील अन्न आणि पोषण सुरक्षा निर्माण करण्यासाठी आयसीएआरने संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाद्वारे बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. अन्नधान्य आणि फळांचे विक्रमी उत्पादन होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात निर्यात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
राज्यात उन्हाचा चटका वाढला तीन दिवस उष्णतेची लाट
जळगाव जिल्ह्यात दोन दिवसात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
वाढली द्राक्षाला तडे जाण्याची भीती
अनेक कृषी उत्पादनांच्या बाबतीत भारत जगात पहिल्या, दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगून त म्हणाले, आमच्या उत्पादनांची गुणवत्ता आणि विश्वासार्ह ब्रँड म्हणून विश्वासार्हता प्रस्थापित करण्याचे आमचे ध्येय आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळावा यासाठी गुणवत्ता महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. त्यांनी परिषदेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या शताब्दी सोहळ्याची (वर्ष – 2029) तयारी सुरू करण्याचे आवाहन केले.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1