कोविडमुळे पतीचे निधन झालेल्या महिलांना, तसेच कोविड एकल महिलांना शासनाकडून तीन एकरांपर्यंत मोफत बियाणे व खते मिळतील. त्यासाठी कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि माणदेशी महिला बॅंकेने पुढाकार घेतला आहे, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा येथे दिली.
सातारा जिल्ह्यात शासनाने केलेल्या कोविड उपाययोजना जनतेपर्यंत किती पोचल्या, याचा आढावा घेण्यासाठी गोऱ्हे आल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन आढावा घेतल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.
हे नक्की वाचा : सरपंच व सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १ वर्षाची मुदतवाढ
पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, कोविडमुळे जिल्ह्यातील २२०२ जणांचा मृत्यू झाला. त्या सर्वांना ५० हजारांची मदत मिळाली आहे. यातील ९८९ एक पालक असलेले आहेत. पतीचे निधन झालेल्या ८५० महिला आहेत. यातील शेतकरी महिलांना तीन एकरांपर्यंत बियाणे व खते मोफत द्यावीत, अशी सूचना केली होती. त्याची अंमलबजावणी आता कृषी विभाग, जिल्हाधिकारी, माणदेशी महिला बॅंक करणार आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये जादा बिलांची आकारणी केली होती, त्याचा अहवाल उद्या मिळणार आहे.

महत्त्वाची घोषणा : आता गोट बँकेची संकल्पना वास्तवात येणार
गरीब लोकांना धर्मादाय रुग्णालयात काही बेड राखीव ठेवण्यात येतात. त्यातील शिल्लक बेड समजावेत, यासाठी रुग्णालयांनी डॅश बोर्ड करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाला केली आहे. श्रमिक कामगारांच्या पोर्टलवर १७ ते ३० मे या कालावधीत नोंदणी सुरू होणार आहे. महामंडळांनी कोविड एकल महिलांना मदत करावी, अशीही सूचना केली आहे, असे गोऱ्हे यांनी सांगितले.
आनंदाची बातमी : महाबळेश्वरमधील मांघर ठरणार देशातील पहिले मधाचे गाव
पूर परिस्थितीत कोल्हापूरच्या धर्तीवर साताऱ्यातही ॲप तयार करावा. त्यासाठी १०० गावांचा त्यामध्ये समावेश करण्याचा निर्णय झाला आहे. कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या मालमत्ता हस्तांतरणाचा प्रश्नही निकाली काढण्यासाठी पालिका व महानगरपालिकांना सूचना त्यांनी केल्या. सातारा जिल्ह्याला कोविड अंतर्गत ७० कोटींची मदत दिल्याचे गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
लक्षवेधी बातमी : रोटावेटर पात्याच्या फटक्याने युवक तरुणाचा मृत्यू

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1