यंदा कोकणातील हापुस आंब्याला वातावरणातील बदलांमुळे मोठा फटका बसला आहे. अवकाळी पाऊस, उष्मा आणि आता फळमाशी यामुळे हापुस उत्पादक शेतकरी, बागायतदार अडचणीत सापडले आहेत. यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे 60 टक्के हापुस आंबा फळमाशीनं बाधित झाला आहे. त्यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सतत बदलत असलेल्या वातावरणाच्या कचाट्यात सापडलेल्या कोकणातील हापुस आंबा पिकाला यावर्षी फळमाशीनं चांगलाच फटका दिला आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी या माशीच्या वाढत्या संक्रमणासमोर यावर्षी हतबल होऊन अक्षरशा हात टेकले आहेत.
हे नक्की वाचा : राज्य सरकारने 8 हजार कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातले : फडणवीसांचा आरोप
हापुस आंब्यावर यावर्षी फळमाशीचा मोठा प्रादुर्भाव आहे. आंबा बागेत फळमाशीनं प्रवेश केला की, आंब्याच्या फळांवर फळमाशी बारीकसे छिद्रं पाढते आणि फळात अंडी घालते. हे छिद्र वरून डोळ्यांनी पाहिलं तरी दिसत नाही. आंबा उतरवून तो पिकायला ठेवल्यानंतर पिकल्यावर एक काळा डाग दिसू लागतो. आणि त्यातून आळी बाहेर पडते. अशा प्रकारे सुमारे ६० टक्के आंबा वाया गेला आहे. .
फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना नसल्याचा आंबा उत्पादक शेतकरी सांगतात. मात्र फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक ट्रॅप लावला जातो. ज्यात मुख्यतः नर अडकतो आणि मरतो. जास्तीत जास्त फळमाशीचा नर मारुन आपोआप फळमाशीच्या प्रजनन क्षमतेवर प्रतिबंध यावा हा त्यामागचा उद्देश आहे. त्यासाठी हा प्रयोग सगळ्याच शेतकऱ्यांनी करायला हवा. एका बागेत केला आणि बाजूच्या आंबा बागेत हे ट्रॅप लावले नाही तर काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे आता फळमाशीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक व्यावस्थापन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
ब्रेकिंग न्यूज : पेट्रोल 9.50 तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त
यदा फळमाशांच्या समस्येमुळे आंब्याच्या उत्पादनात खूप मोठा परिणाम झाला आहे. आंबा बागायतदारांना फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे आडीत पिकवण्यासाठी ठेवलेले बहुतांशी आंबे फेकूनच द्यावे लागले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्लेमध्ये आणि देवगडमध्ये आंबा संशोधन केंद्रं आहेत. मात्र या फळमाशीवर कोणत्याही प्रकारचं संशोधन किंवा उपाययोजना झालेल्या नाहीत. आता तरी विद्यापीठानं संशोधन करून या फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी आंबा उत्पादक शेतकरी करीत आहेत.
आनंदाची बातमी : तीन वर्षात साखर निर्यातीमध्ये १५ पट वाढ
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1