महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर 2020 मध्ये राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे 33 टक्के नुकसान झालेल्या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी 33.64 कोटींचा निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
यासाठी जिरायत आणि अश्वासित सिंचन क्षेत्रासाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर या दराने जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत देण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाची बातमी : ट्रॅक्टर अनुदान योजनेत ‘हा’ केला मोठा बदल
शेतकऱ्यांना प्रती वर्षी कोणत्याना कोणत्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. अशीच परिस्थिती 2020 मध्ये फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांमध्ये उद्भवली होती. या कालावधीमध्ये गारपीट झाल्यामुळे अमरावती विभागात, तसेच जून आणि ऑक्टोबर या कालावधीत राज्याच्या विविध भागांमध्ये शेतकऱ्यांचे गारपिटीमुळे खूप नुकसान झाले होते. त्यांना मदत म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाची बातमी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. इंद्र मणी मिश्रा
यामध्ये अमरावती भागात 2020 मध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीत राज्याच्या विविध भागांमध्ये गारपीट झाली होती. या कालावधी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विभागीय आयुक्त पुणे औरंगाबाद नाशिक व अमरावतीच्या माध्यमातून मदत मिळणार आहे.
शेती पिकांच्या आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीमध्ये जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे 33% नुकसानीसाठी जिरायत आणि आश्वासन सिंचन क्षेत्रासाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर या दराने जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत देण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या अंतर्गत 33.64 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासोबत एक परिशिष्ट जोडण्यात आले असून, त्यामध्ये नाशिक विभागासाठी 7 कोटी 18 लाख रुपये, पुणे विभागासाठी 25 कोटी 26 लाख रुपये, अमरावती विभागासाठी 83 लाख रुपये तर औरंगाबाद विभागासाठी 36 लाख रुपये याप्रमाणे एकूण 33 कोटी 64 लाख रुपये विभाग व जिल्हा निहाय कशा प्रकारची मदत देण्यात आली आहे.
आनंदाची बातमी : देशातील लाखो शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट : कृषीमंत्री तोमर
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1