नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 20 मिमी. एवढा सरासरी पाऊस झाला असून, जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत तर गोदावरी नदी व इंद्रावती नदी या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. सदर नद्या तुडुंब भरल्याने अनेक मार्ग खंडित झाले आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आला आहेत.
आनंदाची बातमी : जायकवाडी धरण 63 टक्क्याच्यावर
नागपूर जिल्ह्यात सध्या 10 हजार 606 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी 35 मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत. कालेश्वरम सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी महत्तम पूर पातळीवरून वाहत आहे. लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे 85 पैकी 85 गेट उघडलेले आहेत. गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आनंदाची बातमी : अमरावती येथील रविंद्र मेटकर यांना जगजीवन राम अभिनव किसान राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
दरम्यान, कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 20.1 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहेत. वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्याकारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दिनांक 30 जुलै 2022 पर्यंत सकाळी 6 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे तर सायंकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच राजापूर कोल्हापूर यांना जोडणारा अनुस्कुरा घाटातील दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन NDRF टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
ब्रेकिंग न्यूज : उद्यापासून महागाई वाढणार ? काय काय महागणार ?

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1