महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दृष्टीने शोध घेण्याचे काम सुरु असल्याचीही माहिती दिली. राज्याच्या भूगर्भात कोळसा, बॉक्साईट, आर्यन या खनिजांसोबत सोनेही असू शकते, असे आता बोलले जात आहे. याबाबत केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाचा अहवाल असल्याचेही सांगितले जात असून, या दृष्टीने आता चाचणीही सुरु करण्यात आल्याचे कळते.
हे नक्की वाचा : शास्त्रशुद्ध बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष सिद्ध होऊ शकते : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
महाराष्ट्रात सोन्याचे दोन ब्लॉक आहेत, अशी माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात हे सोनं निघाले तर ती महाराष्ट्रासाठी मोठी उपलब्धी असेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. सोन्याचे हे दोन ब्लॉक विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणतील सिंधुदुर्ग या जिल्ह्यात असल्याचे सांगितले जातेय.

राज्याच्या भूगर्भात जर खनिजांचा साठा आढळून आला तर देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरु केला जाऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी राज्यातील सोन्याच्या खाणींबाबात केलेला उल्लेख सगळ्यांचे लक्ष वेधणारा ठरला.
नक्की वाचा : हवामान बदलांमुळे केवळ 10 टक्के आंब्याला मोहोर
यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य हे नैसर्गिक साधन संपत्तीच्या बाबतीत अतिशय समृद्ध असून राज्याच्या सकल उत्पन्नात मोलाची भर घालण्याची क्षमता या क्षेत्रात आहे. राज्यातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती दडलेली असून तिचा खाण उद्योगात वापर होणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच गरजेनुसार या खाणींच्या वाणिज्यिक वापर व्हायला हवा या केंद्र शासनाच्या धोरणाला सहकार्य करून राज्यातील खनिकर्म टक्केवारीत वाढ व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

केंद्र सरकारच्या वतीने मुंबईत वाणिज्यिक कोळशाच्या खाणींचा लिलाव व खाण क्षेत्रातील संधी या विषयावरील गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय रेल्वे आणि कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, केंद्रीय सचिव विवेक भारद्वाज उपस्थित होते.
फायद्याची माहिती : हरभरा पेरणीच्या ह्या आहेत पद्धती

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1