शेतकऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज आहे. रखडलेला मान्सून अखेर राज्यात दाखल झाला आहे. काल मुंबईत मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भातही मान्सून पावसाने चांगली प्रगती केली आहे. आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाने सुरुवात केली आहे.
महत्त्वाचे : गायीच्या दूधदरात 8 रुपयांची घसरण
चक्रीवादळ पुढे सरकल्याने मोकळा झालेला मार्ग व मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीला निर्माण झालेले पोषक वातारण, यामुळे आता रखडलेला मान्सूनने वेग घेतला आहे. बंगालच्या उपसागरावरील शाखा बळकट झाल्याने पूर्व भारतात मान्सूनची घोडदौड सुरू झाली आहे. अरबी समुद्रावरील मान्सूनची आगेकूच मात्र थांबलेली आहे.

हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदानुसार पुढील 24 तासात मान्सून राज्यात काही भागात जोरदार प्रगती करणार आहे. आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
यंदा राज्यात मान्सूनच आगमन उशिराने झाले. त्यातच बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा फटका हा मान्सूनच्या वाटचालीला बसला आहे. मात्र चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. शुक्रवारी विदर्भात मान्सूनच आगमन झाले त्यानंतर आता आज मान्सून मुंबईत दाखल झाला आहे. पुढील तीन ते चार दिवसांत विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
मोठी घोषणा : वारीतील वारकऱ्यांना विमा संरक्षण : मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा आणि कोकणामध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसचे कोकण किनारपट्टीवर तीव्र गतीने वारे वाहणार असून, मच्छिमारांना समुद्रात मासेमारी करण्यासाठी न जाण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
गुरूवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी 42.6 अंश सेल्सिअस, तर ब्रह्मपूरी येथे 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार असल्याने तसेच सरासरीच्या तुलनेत 4.5 ते 6.5 अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्याने विदर्भात उष्ण ते तीव्र उष्ण वातावरण होते. उर्वरित राज्यात तापमान 33 ते 42 अंशाच्या दरम्यान आहे.

विदर्भात काल शुक्रवारी मान्सूनचे आगमन झाले. त्यामुळे मान्सूनच्या आगमनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा मान्सून पावसाने व्यापला आहे. काल झालेल्या पावसामुळे विदर्भात कापूस लागवडीला वेग येणार आहे.
ब्रेकिंग : यंदा अजब घडणार : मान्सून चंद्रपूरमार्गे येणार ?

https://www.facebook.com/shetimitramagazine03