शेतकऱ्यांची चिंता दूर करणारी गोष्ट म्हणजे, गेल्या सहा दिवसांपासून थांबलेला मान्सूनचा प्रवास सुरु झाला आहे. गेल्या 24 तासात चांगलीच मजल मारत मान्सून आज गुरुवारी (दि. 8) केरळात दाखल झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज गुरुवारी दुपारी 1 वाजता ही शुभवार्ता दिली आहे.
मान्सून अपडेट्स : चिंता वाढली : मान्सून अजून लांबणीवर
गेल्या 24 तासात मान्सूनची वाटचाल प्रगतीपथावर असून, मान्सून पावसाने दक्षिण अरबी समुद्र, मध्य अरबी समुद्र, संपूर्ण लक्षद्वीप बेटे आणि केरळच्या बहुतांश भागातसह तामिळनाडू, कोमोरीन, मनारचा काही भाग व्यापला आहे. येत्या दोन दिवसात मान्सूनचा हा पाऊस कर्नाटकात पोचणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
तब्बल सहा दिवस एकाच जागेवर ठाण मांडून बसलेल्या मान्सूनने शेवटी आज गुरुवारी देशात प्रवेश केला. मान्सूनच्या आगमनामुळे आज केरळ आणि तमिळनाडूतील अनेक भागात पाऊस सुरु झाला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये मान्सून आणखी प्रगती करेल, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला.
मोठी बातमी : मान्सूनपूर्व पावसाची 11 जिल्ह्यात दांडी : खरीप हंगाम लांबण्याची शक्यता
केरळात दाखल होण्यासाठी मान्सूनने यंदा आठ दिवस उशीर केला आहे. एरवी मान्सून एक जूनला केरळमध्ये दाखल होत असतो. यंदा 4 जूनला मान्सून देशात येईल, असा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला होता. परंतु बिपोरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनची वाटचाल थांबली होती. मात्र आज हे चक्रीवादळ पुढे सरकल्याने आज मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केला.
गेल्या 24 तासात ईशान्य अरबी समुद्रावर ढगांची रेलचेल वाढली आहे. अरबी समुद्रात पश्चिमेकडून साडेचर किलोमीटर उंचीपर्यंत वारे वाहत आहेत. पश्चिमेकडून वाहऱ्या वाऱ्याची उंची कमी झाली आहे. केरळमध्ये मागील 24 तासात सर्वदूर पाऊस पडत आहे.
दुसरकीडे किनारपट्टीलगतच्या भागावर हवामान विभागाने चक्रीवादळामुळे अलर्ट जारी केला आहे. 8 ते 13 जून या कालावधीमध्ये समुद्रकिनाऱ्यालगच्या भागांना अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मासेमारी करणाऱ्यांना खोल समुद्रात जाऊ नये असे आवाहनही करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती पहाता कोकणात 16 जूननंतर मान्सून येईल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आता चक्रीवादळ मान्सूनची वाट अडवणार का ? याकडे देखील हवामान विभागाचे लक्ष असणार आहे.
ब्रेकिंग न्यूज : आज या जिल्ह्यात वादळी पाऊस ?
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1