शेतकऱ्यांबरोबर सर्वांसाठीच गुडन्यूज आहे. चक्रीवादळ पुढे सरकल्याने मोकळा झालेला मार्ग व मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीला निर्माण झालेले पोषक वातारण, यामुळे आता रखडलेला मान्सून वेग घेत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात मान्सून राज्यात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या खात्याच्या मुंबई आणि नागपूर केंद्राने वर्तवला आहे.
महत्त्वाची बातमी : ऊसदरासाठी स्वाभिमानीचे 1 जुलैपासून आंदोलन
दरम्यान, भारतीय हवामान पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनीही यासंदर्भातील ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 23 जूनपासून कोकणातील काही भागात, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची दाट शक्यता आहे. तर 24 ते 25 जूनपासून पावसाचा जोर वाढणार आहे. दरम्यान मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
राज्यात मान्सून ११ जून रोजी दाखल होणार होता. मात्र २२ जून आला तरी मान्सूनचा पत्ता नाही. राज्यात मान्सून दाखल होऊन दहा दिवस झाले आहे. मान्सूनची वाटचाल दिवस जैसे थे होती. ती आता चक्रीवादळ पुढे सरकल्याने प्रगतीपथावर आहे. त्यामुळे रखडलेला मान्सून वेग घेत आहे.
मुळात यंदा पावसाचे उशिरा आगमन होत असल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाचे मृग नक्षत्र चक्क कोरडे गेले आहे. सध्या जून महिना संपत आला तरी अजून पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे. शेतकरी अतेरतेने पावसाची वाट पाहत आहेत. परंतु यंदा मान्सूनला बिपरजॉय चक्रीवादळाने अडथळा आणला. त्यामुळे मान्सून लांबला.
मोठी घोषणा : ऊसतोड कामगार आणि शेतमजुरांची ई श्रम पोर्टलवर नोंदणी
बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरात अन् राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस झाला होता. तर काही भागात उष्णतेची लाट निर्माण झाली. त्याचवेळी महाराष्ट्रातील मान्सूनची वाटचाल थांबली. 15 जून रोजी राज्यात सर्वत्र दाखल होणारा मान्सून अजूनही आला नाही. परंतु आता मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून सर्वत्र दाखल होणार असल्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहेत.
दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मराठवाडा व विदर्भात 22 ते 23 जूननंतर पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे 25 जूननंतर सर्वत्र चांगल्या पावसाला शक्यता आहे. इतकेच नव्हे तर नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, बीड, सोलापूर, लातूर, नांदेड, जालना, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे तर गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मात्र आज तीव्र उष्णतेच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागतील. असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, यंदा जून महिन्यात देशभरात फक्त 37 टक्के इतका कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे चांगला पाऊस पडल्यावर पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरणी करु नये, असे कृषी विभागातील तज्ज्ञांनी म्हटले असून, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करु नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
हे नक्की वाचा : सदाभाऊ खोत यांनी केली ही अजब मागणी
https://www.facebook.com/shetimitramagazine03