कृषी क्षेत्रात होणारा खते आणि कीटकनाशक यांचा वापर कमी करण्यासाठी खासगी क्षेत्राने सरकारला सहकार्य करावे अशे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केले. फिक्की अर्थात भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या 11 व्या कृषीरासायनिक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

महत्त्वाची बातमी : केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे : नितीन गडकरी
आपला देश शेतीवर आधारित आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे योगदान फार मोठे असल्याचे सांगून तोमर म्हणाले, आपल्या देशामध्ये आता फलोत्पादन क्षेत्राला देखील प्रोत्साहन द्यायला हवे. जेणेकरुन आपण सर्व दृष्टीने आत्मनिर्भर होऊ शकू. आपला देश आता अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत अत्यंत सुस्थितीत आहे. जागतिक पातळीवरील स्पर्धेत उतरण्याच्या दृष्टीने आपल्याला शेतीच्या बाबतीत अधिक विकसित राष्ट्रांकडे पाहून नव्या गोष्टी शिकाव्या लागतील. त्यांच्यासोबतच पुढे जावे लागेल. देशात सध्या 10 हजार नव्या शेतकरी उत्पादक संघटना उभारल्या जात आहेत. शेतकऱ्यांना त्यांचा मोठा लाभ होत आहे. भविष्यातही त्या अधिक लाभदायक ठरतील. पिकांमध्ये वैविध्य आणण्याला देखील प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. कृषी विज्ञान केंद्रे शेतकऱ्यांसाठी फार उपयुक्त ठरत आहेत, फिक्कीसारख्या औद्योगिक संस्थांनी कृषी विकासासाठी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन देखील नरेंद्र सिंह तोमर यांनी केले.

ब्रेकिंग न्यूज : खात्यांचे फेरवाटप : शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे कृषी खाते
कीटकनाशकांच्या वापराबद्दल सध्या मोठ्या प्रमाणावर जनजागृती चालू आहे. सध्या मोठ्या प्रमाणवर वाढत चालेला रासायनिक खतांचा वापर आणि घटत चाललेली अन्न धान्याची गुणवत्ता, माणसाच्या आरोग्यावर होणारे घातक परिणाम, निसर्गावर होणारे वाईट परिणाम या सर्व गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. रासायनिक खतांचा अतिवापर धोकादायक आहे. त्यामुळं रासायनिक खतांचा वाढता वापर आणि घातक परिणाम या विषयाचा अभ्यास करणे महत्वाचे असल्याचे नरेंद्र सिंह तोमर यांनी यावेळी सांगितले.
महत्त्वाची बातमी : राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1