परतीच्या पावसामुळे राज्यात शेतीचे मोठे नुकसान झाले झाहे. द्राक्ष बागांच्या ऐन छाटणी काळात पडणाऱ्या या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. पावसामुळे घड जिरण्याचे प्रमाण वाढले असून, डाऊनी आणि करपा रोगाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. एकूणच परतीच्या पावसाने द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत.
हे नक्की वाचा : सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नाही : कृषीमंत्री सत्तार
सध्या राज्यातील द्राक्षबागांच्या फळछाटणीची कामे सुरु असून, द्राक्ष उत्पादक शेतकरी या कामात व्यस्त असतानाच परतीच्या पावसाने राज्यात अक्षरशा धुमाकुळ घातला आहे. आतापर्यंत राज्यातील सुमारे 40 टक्क्यांपर्यंत फळछाटणीची कामे पूर्ण झाली आहेत. फळछाटणी झालेल्या द्राक्ष बागांमध्ये पोंगा, विरळणी, फुलोरा, तर काही ठिकाणी डीपिंगची अवस्था आलत आहे. मात्र काही दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे ही कामे रखडली असून, पावसामुळे द्राक्ष बागेवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

या पावसामुळे पावसामुळे द्राक्ष बागेवर रोगांचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, पावसामुळे घड जिरण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय डाऊनी आणि करपा रोगाचा प्रसार वाढत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. द्राक्ष बागांवर परतीच्या पावसाचे ग्रहण लागले असल्याने ऐन छाटणीत पडणारा पाऊस द्राक्ष बागांच्या जिवावर उठला आहे.
मोठी बातमी : गोकुळच्या दूध खरेदी दरात उद्यापासून वाढ
राज्यात द्राक्षाचे सर्वसाधारपणे चार ते पाच लाख एकर क्षेत्र आहे. वास्तविक पाहता, दरवर्षीपेक्षा यंदाच्या हंगामात फळछाटणीस विलंब झाला आहे. त्यातूनही शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत फळ छाटणी घेतली आहे. सांगली विभागात सुमारे 40 टक्के, सोलापूर, लातूर आणि उस्मानाबाद या ठिकाणी 10 टक्के पुणे विभागात 50 टक्के, तर नाशिक भागात 40 टक्के अशी एकूण 40 टक्क्यांपर्यंत फळ छाटणीची कामे पूर्ण झाली आहेत.
ब्रेकिंग न्यूज : दिवाळीनंतर कांदा महागणार !
फळ छाटणी केल्यानंतर वेलींवर चांगल्या दर्जाचे घडही लागले आहेत. हंगामपूर्व आगाप फळछाटणी केलेल्या द्राक्ष बागांची पोंगा, विरळणी, फुलोरा, तर काही ठिकाणी डीपिंगची अवस्था आली आहे. काही ठिकाणी वांझ फूट काढण्याची कामे सुरू आहेत. मात्र पावसामुळे द्राक्ष हंगाम छाटणीपासून अडचणीत आला आहे. डाऊनीचा फैलाव होण्याची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी बागांवर डाऊनी रोगाचा प्रादुर्भावही झाला असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे घड जिरण्याचा प्रकारही होऊ लागला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा परिसरात हंगामपूर्व द्राक्षाची काढणी सुरू आहे. आता पडणाऱ्या पावसामुळे या द्राक्षाचे नुकसान होण्यास प्रारंभ झाला आहे.

सध्या पाऊस असल्याने काही भागातील द्राक्षबागेत पाणी साचले आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी फळछाटणीचे केलेले नियोजन कोलमडले आहे. सातत्याने वातावरण बदलत आहे. परिणामी फळछाटणीला ब्रेक लागला आहे. राज्यातील द्राक्षावर परतीच्या पावसाचे संकट ओढावले आहे. या पावसामुळे रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. असल्याचे महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी सांगितले आहे.
हे वाचा : भाजीपाल्याचे भाव कडाडले !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1