अवकाळीमुळे द्राक्ष बागांना फटका: डाऊनी, भुरीचे असे करा नियंत्रण

0
513

यंदा महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला असून, हाहाकाराचे सत्र अजून सुरूच आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यात काही भागात ढगाळ तर काही भागात पडलेल्या पावसामुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसला असून, हजारो एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागांमध्ये डाऊनी, भुरी, घडकूज आणि द्राक्षमण्यांची गळ या समस्या निर्माण झाल्या आहेत.

यंदाच्या अतिवृष्टीने सर्वच शेतकर्‍यां मोठा फटका बसला आहे. बहुतांश शेतर्‍यांचा खरीप हंगाम अक्षरश: त्याच्या डोळ्यासमोरच पाण्यात गेला आहे. अजूनही काही भागात रब्बीची पेरणी होऊ शकलेली नाही. अतिरिक्त पाण्यामुळे जमीन घट्ट झाल्याने उगवण न झाल्याने रब्बी हंगामात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. खरीपातील तूरचे उभे पिक वाया गेले आहे. कांदा पिकाचेही मोठे नुकसान होत असून कांदा पोसला जात नाही. त्यामुळे यंदा काद्याचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर पुन्हा गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाळी वातावरणामुळे शेतकर्‍यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. याचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागायतदारांना बसण्याची शक्यता आहे.

सध्या द्राक्ष फुलोर्‍याच्या अवस्थेत आहेत. ढगाळ वातारणामुळे द्राक्ष बागांवर मोठा परिणाम होऊन लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यात आहे. गेल्या आठवड्यापासून काही भागात पाऊस सुरू असल्याने यामुळे डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सांगली भागात याचे परिणाम दिसून येत आहेत. त्याचा प्रतिबंध करण्यासाठी फवारण्या कराव्या लागाणार असून, फवारणीच्या खर्चात वाढ होणार आहे. तसेच डाऊनी सोबत पावसाचे पाणी द्राक्ष घडात साचून घडकूज होण्याची शक्यात आहे. परिणामी द्राक्षमणी गळण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा प्रकारच्या नुकसानीचा सर्वाधिक परिणाम सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात दिसून येत असून, नाशिक भागात डाऊनचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती द्राक्ष बागायतदारांकडून व्यक्त होत आहे.

प्रत्येक वर्षी द्राक्ष बागायतदारांना अशा वेगवेगळ्या संकटाला सामोरे जावे लागतेच. निसर्गाच्या लहरीपणा शेतकरी अक्षरशा वैतागले आहेत. कधी अतिवृष्टीचे सावट, कधी गारपीट तर कधी अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. द्राक्ष बागांवर असे संकट आले की, फवारणीचा खर्चाबरोबरच नुकसानीचे प्रमाणही वाढते आणि उत्पादनावर परिणमा होतो. एकूणच द्राक्षशेती नियोजनानुसार फायद्याची ठरत नाही.

नियंत्रणासाठी उपाययोजना

ढगाळ वातावरण झाल्यानंतर दुपारचे तापमान कमी होते आणि रात्रीचे तापमान वाढते. त्यामुळे सध्या बऱ्याच विभागांमध्ये सकाळी दव पडत आहे. ते कमी होईल किंवा पडणार नाही. असे झाल्यास डाऊनीचा धोका कमी होईल. सध्या बऱ्याच विभागांमध्ये शेंड्यावरती वाढणाऱ्या पानांवरती डाऊनी दिसत आहे. सध्या अशा प्रकारच्या डाऊनीचा नवीन प्रादुर्भाव होणार नाही. परंतु ढगाळ वातावरणामध्ये जुनी जिवंत असलेली डाऊनी फुलण्याची शक्‍यता आहे. परंतु अशी फुललेली डाऊनी दिसल्यास नियंत्रणासाठी जास्त फवारणीची जरुरी नाही.

हेही वाचा :

द्राक्षावरील या खतरनाक रोगांचे असे करा नियंत्रण !

द्राक्षावरील मिलीबग्ज् (पिठ्या ढेकूण)चे असे करा नियंत्रण

द्राक्षावरील थ्रिप्स, तुडतुडे

थंडीत फळबागांची अशी घ्या काळजी

जर छाटणीनंतर 50 दिवसांपुढे बाग पोचलेली असल्यास अशा बागेमध्ये पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ऍसिड 2 ते 3 ग्रॅम अधिक मॅन्कोझेब 2 ग्रॅम मिसळून फवारणी करावी. शक्‍य झाल्यास शेंड्याच्या काही पानांवर वाढलेली डाऊनी काढून टाकावी.

जर फुलोऱ्याच्या जवळपास बाग असल्यास आंतरप्रवाही बुरशीनाशके उदा. डायमिथोमार्फ (50 टक्के) 1 ग्रॅम व मॅन्कोझेब दोन ग्रॅम किंवा इप्रोव्हॅलिकार्ब अधिक प्रॉपीनेब संयुक्त बुरशीनाशक 3 ग्रॅम किंवा मॅन्डीप्रोपामीड 0.65 मि.लि. प्रति लिटर अधिक दोन ग्रॅम मॅन्कोझेब, सायमोक्‍झॅनील अधिक मॅन्कोझेब 3 ग्रॅम प्रति लिटर मिसळून फवारावे.

फुलोऱ्याच्या जवळपास असलेल्या बागांमध्ये डाऊनी मिल्ड्यूच्या नियंत्रणासाठी दोन फवारण्यांतील अंतर आता पाच ते सहा दिवसांपर्यंत वाढविल्यास धोका राहणार नाही.

भुरीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना

ढगाळ वातावरणामध्ये विशेषतः काड्या व घडांची जास्त गर्दी असलेल्या बागांमध्ये वेगाने भुरी वाढू शकते. अशा बागांमध्ये आता भुरीच्या नियंत्रणासाठी फवारणी आवश्‍यक आहे. बागा छाटणीनंतर 50 ते 60 दिवसांपर्यंत असल्यास डिनोकॅप 25 मि.लि. प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

फुलोऱ्याच्या जवळपासच्या बागांमध्ये हेक्‍झाकोनॅझोल 5 ईसी 1 मि.लि. प्रति लिटर किंवा फ्ल्यूसिलॅझोल 25 मि.लि. प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. ज्या ठिकाणी अगोदरच भुरी वाढलेली असेल, अशा ठिकाणी या बुरशीनाशकांच्या बरोबरीने पोटॅशिअम बायकार्बोनेट 5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात मिसळून फवारल्यास चांगले नियंत्रण मिळेल.

गर्दी असलेल्या बागांमध्ये आतल्या भागापर्यंत बुरशीनाशकाची फवारणी चांगल्या प्रकारे पोचत नाही, म्हणून प्रथम बागेतील गर्दी झालेली खालची पाने काढून बुरशीनाशकाची फवारणी केल्यास चांगले नियंत्रण मिळेल.

फळधारणा झाल्यानंतर फ्ल्यूसिलॅझोल आणि हेक्‍झाकोनॅझोलची फवारणी शक्‍य नाही. असे केल्यास रेसिड्यूचा धोका वाढेल. छाटणीनंतरच्या 60 दिवसांनंतर डायफेनकोनॅझोल अर्धा मि.लि. प्रति लिटर किंवा टेट्राकोनॅझोल 0.75 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून भुरीच्या नियंत्रणासाठी रेसिड्यूचा धोका न घेता वापरणे शक्‍य आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here