भविष्याचा विचार करता सौरऊर्जेवरच अवलंबून न राहता आता ग्रीन हायड्रोजनचा वापर वाढवण्याची गरज असून, ग्रीन हायड्रोजन हेच भविष्यातील इंधन आहे. असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
ऑल इंडिया रिन्युवेबल एनर्जी असोसिएशनच्या नागपूर मुख्यालयाच्या स्थापना समारंभात उद्घाटक म्हणून गडकरी बोलत होते. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा सचिव दिनेश वाघमारे, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण-महाऊर्जाचे महासंचालक रवींद्र जगताप उपस्थित होते.
ब्रेकिंग न्यूज : उसाला प्रतिटन 3050 रुपये एफआरपी जाहीर
इथेनॉलवर वाहने चालविल्यास नागरिकांची मोठी बचत होईल. असे सांगून गडकरी म्हणाले, रासायनिक उद्योगाशिवाय जिथे बॉयलरचा वापर होतो, अशा ठिकाणी ग्रीन हायड्रोजनचा वापर करण्याच आता गरज निर्माण झाली आहे. उद्योजक सोलर रूफ पॅनेलच्या साह्याने वीज वापरतात. त्यांना वीजबिलात अनुदान मिळेल, अशी योजना केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाने तयार केली होती. परंतु त्याला वितरण कंपन्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याची नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली.
महत्त्वाची बातमी : कापसाचा पीए 837 सरळ वाण विकसित
महावितरण कंपन्यांच्या वितरणामध्ये 10 लाख कोटींपेक्षा जास्त नुकसान होत असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, त्यामुळे वीज प्रीपेड कार्ड ही प्रणाली आणण्याची योजना केंद्रीय मंत्रिमंडळापुढे आहे. सौरऊर्जेपासून सार्वजनिक स्थळावर तसेच सार्वजनिक परिवहन व्यवस्था संचालित केल्यास विजेची बचत होईल. सौरऊर्जेचा वापर महामेट्रो नागपूरसुद्धा करत आहे. परंतु यावरच अवलंबून न राहता ग्रीन हायड्रोजनचा वापर वाढवावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.
हे नक्की वाचा : राज्यातील आठ मिश्र खत उत्पादकांना नोटीसा
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1