शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्ननात वाढ व्हावी, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. विविध योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढावा या अनुषंगाने देखील शासनाकडून अनुदान दिले जाते. अशाच एका योजनेतून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि औजारांसाठी 50 टक्के अनुदान दिले जात आहे.
ब्रेकिंग न्यूज : टोमॅटोचा राडा : 50-100 रुपये कॅरेट
सध्या शेतकऱ्यांना शेतीसाठी ‘एक शेतकरी एक अर्ज योजना अनेक’ या योजनेंतर्गत सर्व योजना राबवल्या जातात. याच अंतर्गत शेती अवजारांसाठी कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाते. शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत शेती अवजारे आणि ट्रॅक्टरसाठी अनुदान दिले जाते. आता याच योजनेंर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून, अनेकांना निम्या किमतीत ट्रॅक्टर मिळणार आहेत.
शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि औजारांसाठी 50 टक्के आणि 40 टक्के अनुदान दिले जाते. ज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती व महिला शेतकरी आणि अल्प व अत्यल्प भूधारक प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान आणि इतर शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान दिले जाते. महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी सर्व योजना राबविण्यात येतात. शेतकरी या पोर्टलवर कृषी विभागाच्या योजनांची माहिती मिळवू शकतात आणि अर्ज करू शकतात.
हे नक्की वाचा : लाल मिरची ठसका वाढला : दरात विक्रमी वाढ
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू करावा लागतो. ज्यासाठी तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना हे अनुदान दिले जाते. तुम्ही ट्रॅक्टर आणि अवजारांसाठी अर्ज करू शकता. यासाठी काही पात्रता आणि अटी घालण्यात आल्या आहेत.
पात्रता आणि अटी
या योजनेत एक शेतकरी फक्त एक ट्रॅक्टर घेऊ शकतो. शेतकरी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. म्हणजे राज्य सरकारकडून दिले जाणारे अनुदान केवळ एका साधनासाठी दिले जाते. उदाहरणार्थ (ट्रॅक्टर इम्प्लिमेंट्स / मशिनरी) आधार कार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे ट्रॅक्टर असल्यास लाभार्थी ट्रॅक्टर चल उपकरणासाठी पात्र मानला जाईल. पण त्यासाठी ट्रॅक्टरचा पुरावा जोडणे आवश्यक आहे. जर एखाद्या लाभार्थ्याने एखाद्या इन्स्ट्रुमेंटसाठी लाभ घेतला असेल परंतु तो त्याच इन्स्ट्रुमेंटसाठी किमान 10 वर्षे अर्ज करू शकत नसला तरी दुसऱ्या साधनासाठीअर्ज करू शकतो.
जर एखाद्या शेतकऱ्याने यापूर्वी कोणतेही कृषी अनुदान घेतले असेल तर तो ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. अर्जदाराचे वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे.