साखर उत्पादन आणि उसाचे गाळप या दोन्ही क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात अतिरिक्त उसाच्या प्रश्नाचा मोठा गोंधळ सुरू आहे. यंदा उसाच्या क्षेत्रता कमालीची वाढ झाली आहे. कारखान्याचे हंगाम संपले तरी अजून महाराष्ट्रात 90 लाख टन उसाचे गाळप होणे शिल्लक राहिलेले आहे.
महाराष्ट्रातील ज्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील गाळप संपलेले आहे; अशा कारखान्याचे ऊस तोडणी यंत्र मागवूनही वेळेमध्ये ऊस तोड होणे अशक्य असल्याचे लक्षात आल्याने आता परराज्यातून ऊसतोडणी यंत्र मागविण्याची तयार सुरू झाली आहे.
राज्यात गेल्या सहा महिन्यापासून ऊस तोडणी सुरू असून अजून सुमारे 90 लाख टन उसाचे गाळप होणे बाकी आहे. सध्याचा ऊस तोडीच वेग लक्षात घेता पावसाळ्यापर्यंत उसाचे गाळप सुरूच राहण्याची शक्यता आहे. यंदा उसाचे क्षेत्र वाढल्याने गाळप आणि साखरेचे उत्पादनही विक्रमी होणार आहे. गाळप लवकर व्हावे यासाठी आता ऊस तोडणीचा वेग वाढविण्यासाठी कर्नाटक राज्यातून ऊस तोडणी यंत्रे आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
👇👇👇 अजून काही महत्त्वाच्या बातम्या 👇👇👇
कापसावरील आयातशुल्क रद्द : दरातील तेजी कायम राहणार
यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस : स्कायमेटचा अंदाज
उसाप्रमाणे दूधच्याही एफआरपी संरक्षणासाठी आता देशस्तरावर संघर्ष
कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांची ऊस तोडणी यंत्रे ताब्यात घेण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू झाले असून, पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या यंत्रणा त्या कामाला लागल्यास महाराष्ट्रातील विशेषत: मराठवाड्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1