विदर्भात उष्णतेची लाट ; तर राज्य पुन्हा तापणार !

0
400

राज्यात सध्या उन्हाचा जोर वाढला असून, काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. हवामान विभागाने विदर्भात दोन दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबई उपनगरांसह कोकण विभागात पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

महत्त्वाची घोषणा : शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपण उभारण्यासाठी अनुदान मिळणार

एकीकडे विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यात आज आणि उद्या उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला असताना दुसरीकडे मात्र, महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, तसेच कोकणातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मेघगर्जना होण्याचा अनुभव येत आहे.

हे वाचा : शाश्वत उत्पन्नासाठी बांबू लागवड किफायतशीर : जयंत पाटील

दरम्यान निम्म्या भारतामध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याने महाराष्ट्रातही तापमानवाढ कायम राहणार आहे. राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. मुंबईजवळील काही भाग आणि ठाणे जिल्ह्यांत तुरळक भागात तापमान विदर्भाप्रमाणे 43 ते 44 अंशांपर्यंत पोहोचले आहे. एप्रिलच्या सुरुवातीपासूनच राज्यात तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे राहिलेला आहे.

फायद्याची बातमी : अतिरिक्त उसाच्या गाळपासाठी प्रति टन 200 रुपये अनुदान देणार

यंदा एप्रिल महिन्यात उष्णतेचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. काही ठिकाणी तर तापमानाच्या पारा 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवस उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.

लक्षवेधी बातमी : खरिपातील उत्पादनवाढीसाठी पर्यावरणाकडे दुर्लक्ष : एस. चंद्रशेखर

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here