8 जून रोजी महाराष्ट्रात मोसमी पावसाची दमदार हजेरी लागणार असून यंदा चांगल्या प्रकारे पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. मान्सूनचे आगमन लवकरच होणार असल्याने शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे वेळेत उरकून घ्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मोठी बातमी : राज्यात पुढील तीन दिवसात पाऊस !
दरम्यान आजपासून तीन दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता देखील डख यांनी वर्तवली आहे. त्यांच्या अंदाज नुसार येत्या 22, 23, 24 मे रोजी मान्सूनपूर्व पाऊस पडणार आहे. जून महिन्याच्या 1, 2, 3 तारखेला देखील पाऊस पडणार असल्याचे डख यांनी सांगितले आहे. तर 8 जून रोजी महाराष्ट्रात मोसमी पावसाची दमदार हजेरी लावून यंदा चांगल्या प्रकारे पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आता नेमका किती पाऊस पडणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. तसेच मशागतीची कामे करत आहेत. पंजाबराव डख यांनी आपल्या अभ्यासानुसार यंदा चांगल्या प्रकारे पाऊस पडणार असल्याचे सांगितले.
फायद्याची माहिती : एनएमके-1 सिताफळाला आता छाटणीनंतरच पाणी द्या : डॉ. कसपटे
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1