Punjabrao Dakh Weather Forecast : हवामान अभ्यासक (Meteorologist) पंजाबराव डख यांनी पुढील 15 दिवसाचा हवामानाचा अंदाज जाहीर केला असून, त्यांच्या मते 17 ऑगस्टपासून 30 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडणार आहे.
मोठी बातमी : थकित एफआरपी ठेवणाऱ्या 4 साखर कारखान्यांविरुघ्द जप्तीचे आदेश
सध्या पावसाने खंड दिल्याने शेतकऱ्यांसह सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा आहे. सोयाबीन, कापूस या पिकांना सध्या पावसाची गरज आहे. राज्यात 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणारा पाऊस पिकांसाठी संजीवनीच ठरणार आहे. मराठवाड्यासह राज्यातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. पाण्या अभावी पिके सुकून चालली आहेत. अशातच हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांनी दिलासादायक अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांनी येणाऱ्या 15 दिवसाचा हवामानाचा अंदाज (Weather Forecast) व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, 17,18 आणि 19 ऑगस्ट या काळात पावसाचा जोर वाढत जाणार आहे. आगदी 30 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस होणार आहे. 18 व 19 ऑगस्टपर्यंत मराठवाड्यात (mrathvada) पाऊस हजेरी लावणार आहे. त्यानंतर पाऊस तसाच उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात (Kokan) जोर धरणार आहे. एकूण 30 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस होणार आहे.
पंजाबराव डख यंच्या मते, पावसाळा आनखी अडीच महिने शिल्लक राहीलेला आहे, यंदा दुष्काळ पडणार नाही. कमी दिवसात जास्त पाऊस पडणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. यंदाही भरपूर पाऊस पडणार आहे, सगळी तळी (Lake), आणि धरणे (Dam) भरून निघणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाचे : कांद्याबाबत केंद्राने घेतला मोठा निर्णय : कांदा उत्पादकांना बसणार फटका
https://www.facebook.com/shetimitramagazine03