राज्यात पुन्हा पाच दिवस धुव्वाधर पाऊस

0
2084

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून आजपासून मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र शनिवारी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. परिणामी येत्या 12 तासात चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील 24 तासात हे हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र ओडिशा किनाऱ्याच्या दिशेने सरकणार आहे.

याचा परिणाम म्हणून पुढील चार ते पाच दिवस राज्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषत: रविवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे हवामान खात्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तसेच मुंबईसहित कोकणातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. संबंधित जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा :

पपई बागेतील रोगांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना

पेरू फळबागेवर पडणार्‍या रोगांवर कसा मिळवावा विजय ?

शिकूण घ्या ! आवळा लागवडीचे उत्पादन तंत्रज्ञान

जून महिन्यात मान्सूनने दिमाखात आगमन केल्यानंतर, राज्यात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे. पण यंदा परतीच्या पावसाचा काहीसा उशीर होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 7 ते 8 ऑक्टोबरपासून राजस्थानातून परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही उशीरा परतीचा पाऊस दाखल होणार आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here