नाशिक (Nashik) जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळित झाले असून, नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण, दिंडोरी या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यात अजून अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने धरण प्रकल्पातून विसर्गही सुरू असून प्रसंगी विसर्ग वाढविण्यात येणार आहे. नदीकाठावरील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.
जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. काही भागात अतिवृष्टीही (Heavy rains) झाली आहे. दारणा, गंगापूर, गिरणा, पालखेड धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने या समूहाच्या धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आला आहे. गोदावरी, दारणा, कडवा, गिरणा, पुनद, कादवा, पाराशारी या नद्यांना पूर आला आहे. गोदावरी व गिराणा नदीला पूर आल्याने या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पानवेली असल्याने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पाण्याने प्रवाह बदलल्याने पाणी लगतच्या शिवारात शिरल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
लक्षवेधी बातमी : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील पिकांना फटका
गंगापूर, पालखेड, करंजवण, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, दारणा, भावली, मुकणे, कडवा, चणकापूर, हरणबारी या धरणात मोठया प्रमाणावर पाणी येत आहे. इगतपुरी, पेठमध्ये भात रोपे पाण्याखाली गेली आहेत. तसेच कळवण, देवळा तालुक्यांतील गिरणा व निफाड तालुक्यांतील गोदावरी काठच्या गावातील पिके पाण्याखाली गेली आहे. सर्वदूर झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. तर पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर अधिक असल्याने पुराचे पाणी शिवारात आल्याने ऊस, मका, सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हे नक्की वाचा : रत्नागिरी जिल्ह्यात धुव्वाधार पाऊस
जिल्ह्यातील 52 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दिंडोरी तालुक्यातील नानाशी महसूल मंडळात 395 मिलिमीटर तर पेठ तालुक्यातील जोगमोडी महसूल मंडळांत 376 मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. पेठ तालुक्यांत सर्वदूर अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. येथे सरासरी 769.3 मिमी पाऊस नोंदविला गेला. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील व सर्व तालुक्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील दारणा धरणातून 15088 विसर्ग (क्युसेक) सोडण्यात आला आहे. कडवा धरणातून 3517 विसर्ग (क्युसेक) सोडण्यात आला आहे. गंगापूर धरणातून 10035 विसर्ग (क्युसेक) सोडण्यात आला आहे. पालखेड धरणातून 30188 विसर्ग (क्युसेक) सोडण्यात आला आहे. करंजवण धरणातून 15680 विसर्ग (क्युसेक) सोडण्यात आला आहे. पुणेगाव धरणातून 3918 विसर्ग (क्युसेक) सोडण्यात आला आहे. चणकापूर धरणातून 21272 विसर्ग (क्युसेक) सोडण्यात आला आहे. व हरणबारी धरणातून 6221 विसर्ग (क्युसेक) सोडण्यात आला आहे. तर नांदूर मधमेश्वर 78276 विसर्ग (क्युसेक) सोडण्यात आला आहे.
आनंदाची बातमी : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान मिळणार : मुख्यमंत्री
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1