पावसाचा जोर वाढल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील सध्या धुव्वाधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील जगबुडी आणि नारिंगी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीपात्रातील पाणी खेडमधील किनाऱ्यावरील लोकवस्तीमध्ये शिरू लागल्याने प्रशासनाकडून सुरक्षिततेसाठी पावले उचलली आहेत. दरम्यान, अशाही परिस्थितीत जिल्ह्यात भात लावणीचा वेग वाढला असून, आतापर्यंत 30 हजार हेक्टरवरील भात लागवड पूर्ण झाली आहे.
पूरप्रवण क्षेत्रात येणारी गावे आणि शहरातील नागरिक, व्यापारी यांना दक्ष राहण्याच्या इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. खेड बाजारपेठेत अजून पाणी आले नसले तरी या दोन्ही नद्यांच्या पाण्याचा वेढा शहराला कधीही पडण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सजग झाली आहे.
आनंदाची बातमी : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान मिळणार : मुख्यमंत्री
मंगळवारी (ता. 12) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या 24 तासात मंडणगडला 105 मिमी, दापोली 62 मिमी, खेड 121 मिमी, गुहागर 15 मिमी, चिपळूण 93 मिमी, संगमेश्वर 108 मिमी, रत्नागिरी 14 मिमी, लांजा 95 मिमी, राजापूर 51 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेले आठ दिवस खेड तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जगबुडी, नारंगी नद्या दुथडी भरून वहात असून या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या मोठ्या नद्यांना येऊन मिळणारे ओढे, ओहोळ यांचे पाणी वाढले आहे. परिसरातील डोंगराळ भागात दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे किनारी भागातील शेतीची कामे रखडली आहेत.
नक्की वाचा : अतिवृष्टीमुळे 15 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
पावसाचा जोर वाढतच राहिला तर खेड शहरात कधीही पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. अशी परीस्थिती निर्माण झाल्यास मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) पथक तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे 18 प्रशिक्षित जवान आणि दोन वरिष्ठ अधिकारी खेड शहर व परिसरातील पूर्वपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरड प्रवण क्षेत्रातील ग्रामस्थांच्या सुरक्षेची जबाबदारी याच पथकावर आहे.
धक्कादायक बातमी : बीडमध्ये गोगलगायीमुळे पिकांचे मोठे नुकसान
मुसळधार पावसामुळे सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या चिपळूण तालुक्यातील नांदीवसे ग्रामपंचायतीमधील राधानगरवाडीच्या वरील डोंगरास 200 मीटरची भेग पडली. गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी ग्रामस्थांशी चर्चा सुरू आहे.
दरम्यान, समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील भात लावण्यांची कामे वेगाने सुरू आहेत. जिल्ह्यात 70 हजार हेक्टरवर भात लागवड होते. आतापर्यंत 30 हजार हेक्टरवरील भात लागवड पूर्ण झाली आहे. साधारणपणे चाळीस टक्क्यांहून अधिक लागवडीची कामे पूर्ण झाल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
महत्त्वाचा सल्ला : नैसर्गिक शेतीची लोकचळवळ यशस्वी ठरेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1