सध्या उन्हाळा एवढा वाढतच चालला आहे की उन्हाने सगळ्यांना हैराण करून सोडले आहे. मात्र या दरम्यानच २१ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान अर्ध्या महाराष्ट्र राज्यात वादळी वारे तसेच पाऊस पडण्याची दाट शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.
महत्त्वाची बातमी : भोंग्याच सोडा शेतकऱ्यांच्या विजेचे बघा : राजू शेट्टी

या संदर्भात के. एस. होसाळीकर यांनी ट्विटर च्या माध्यमातून माहिती दिली आहे. २१ ते २३ एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटसह वादळ तसेच पाऊस पडणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे अनेक फळबाग उत्पादकांना चिंता पडलेली आहे. राज्यामध्ये दिवसेंदिवस कडाक्याचे ऊन पडत आहे. काही जिल्ह्याचा तापमानाचा पारा हा ४० अंश डिग्री सेल्सिअस पुढे गेलेला आहे. अशातच पाऊसाचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने शेतकऱ्यामध्ये चिंता वाढलेली आहे.
नक्की वाचा : फळबागांमध्ये आंबा लागवडीलाच प्राधान्य
राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यात २१ आणि २३ एप्रिल दरम्यान पाऊस पडणार असल्याचे सांगितले गेले आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण बनलेले आहे. अगदी हातातोंडाला आलेले पीक मातीमोल होणार अशी भीती शेतकऱ्यांमध्ये बसलेली आहे. पुणे वेध शाळेने वर्तविला असलेला हा अंदाज जर अचूक ठरला तर शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
आनंदाची बातमी : जातिवंत शेळ्यांच्या पैदाशीसाठी राज्यात तीन हजार कृत्रिम रेतन केंद्रे उघडणार
बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमधे जास्त पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. या जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार असल्याचे सांगितले गेले असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हतबल झालेले आहेत.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1













Users Today : 20
Users Last 30 days : 773
Users This Month : 98
Users This Year : 810
Total Users : 236259