राज्यात मागच्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा थैमान घालण्यास सुरू केले आहे. पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिली असून, गणेश विसर्जनावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे.
मोठी बातमी : राज्यातील बाजार समित्यांचा निवडणूका जाहीर
काल (दि. 07) राज्यात कोल्हापूर, सातारा, पुण्यासह विदर्भातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश पाऊस झाला. असून, मागच्या 24 तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी रात्रीपासून पुणे, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला. बुधवारी दुपारनंतर मुंबईसह सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह मुसळधारेने झोडपले.
आज 8 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. सध्या राज्यातील अनेक भागात दमदार आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू आहे तर काही भागात पावसाची गरज आहे. हवामान बदलाचा मोठा परिणाम दिसून येत असून, दिवसभर उन्हाचा चटका आणि रात्रभर पाऊस अशी स्थिती राज्यात पहावयास मिळत आहे. पावसामुळे शेतकरी सुद्धा चिंतेत असून, हाती आलेले पीक जाण्याची भीती शेतकरी वर्गाला आहे.
राज्यातील अनेक भागात आजपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामध्ये विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात यांचा समावेश आहे.
महा ब्रेकिंग न्यूज : वीज दरात पुन्हा वाढ होणार : शिंदे सरकारचा झटका
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गंगानगर, हिस्सार, हर्दोई, गोरखपूर, पाटणा, जमशेदपूर, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. कर्नाटक आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहून, ढगाळ हवामानासह हलक्या व मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच हवामान खात्याने आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना य अलर्ट जारी केला आहे.
महत्त्वाच्या टिप्स : जनावरांमधील घातक लम्पी स्कीन रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1