सद्य स्थितीला हवामानातील बदल, अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे पूर्णपणे शेतीवर अंवलंबून रहाणे सुरक्षीततेचे राहिलेले नाही. शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिल्याशिवाय शेती फायद्याची होणे अशक्यच झाले आहे. शेतीपूरक व्यवसायामध्ये सर्वात सहज आणि सोपा असलेला व्यवसाय म्हणजे मत्स्य व्यवसाय होय. मत्स्य व्यवसाय हा थोडा मेहनतीचा असला तरी त्याला ज्ञानाची सांगड घातल्यास तो अतिशय भरभराटीचा होऊ शकतो. वास्तविक हा चिकाटीचा परंतू सोपा व्यवसाय आहे.
शेती या व्यवसायासोबत मत्स्य व्यवसाय हा जोडधंदा केल्यास नक्कीच ते फायदेशीर ठरू शकते. वाढती लोकसंख्या व त्यासोबतच सुशिक्षीत तरूणांना नौकरीत संधी नसल्यामुळे मत्स्यव्यवसायाला पूरक असे हे 11 व्यवसाय करता येवू शकतात. हे बेरोजगार तरूणांचा रोजगारासाठी एक अतिशय उत्कृष्ठ साधन बनू शकेल.
1. लहान व मोठ्या धरणामध्ये मत्स्यसंवर्धन : राज्यात अनेक लघु व मोठे धरणे आहेत. या धरणामध्ये कटल, रोहू व मृगल या जातीच्या मास्याचे शेती होऊ शकते. या माशांसोबत गोड्या पाण्यातील झींगे देखील वाढवीले जाऊ शकतात. असे लघु-मोठे तलाव आपणास मत्स्य सोसायटी स्थापन करून मत्स्यविभागाकडून भाडेतत्त्वावर उपलब्ध होऊ शकतात. रोहू, कटला, मृगल व गोड्या पाण्यातील झिंग्यांना बाजारात अतिशय चांगली मागणी असते. या माश्यांचा व झींगा संवर्धनाचा कालावधी एका वर्षांचा असतो. या माशांची व झींग्यांची योग्य त्या पद्धतीने धरणांमध्ये वाढ झाल्यास त्यास बाजारात चांगली किंमत मिळते व हा व्यवसाय देखील स्वयंरोजगाराचे चांगले साधन बनू शकेल.
2. मत्स्यबीज पूरवीणे : महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी लहान व मोठे मत्स्य तलाव व शेततळी बांधण्यात आलेली आहेत. तसेच राज्यात अनेक लहान व मोठे धरणे आहेत. उच्च प्रतिचे बिज योग्य वेळी योग्य प्रमाणात उपलब्ध होणे ही मत्स्य संवर्धनाची यशाची गुरकिल्ली आहे. मत्स्य व्यवसायाची प्रगती महाराष्ट्रात जोमाने सुरू आहे. त्याच बरोबर मत्स्य बिजांचीही मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. हे बिज महाराष्ट्रात व भारतात मत्स्य बिज उत्पादन केंद्रातून सहजरीत्या उपलब्ध होते. हे बिज मत्स्य शेती करणार्या इच्छकांपर्यंत पोहचवून स्वयंरोजगाराचे चांगले साधन उभे करता येऊ शकते.
3. मत्स्य तलावातील शोभिवंत मास्यांचे संवर्धन : आपल्याकडे शेत जमीन असल्यास शेत जमिनीत मत्स्य संवर्धन करता येऊ शकते. यात प्रामुख्याने गोड्यापाण्यातील संवर्धनयुक्त शोभिवंत मासे जसे की गोल्डफिश, एंजल, मोली, गप्पी आतण स्वर्डटेल इत्यादी हे शोभिवंत मासे संवर्धन करता येतील. या माश्यांचे बिज घेऊन ते 30 बाय 30 बाय 5 फूट आकाराच्या तळ्यात व तळ्याची खोली साधारण दोन मिटर मध्ये सोडल्यास तीन ते चार महिन्यात बाजारात विक्रीसाठी तायर होतात. बाजारात हव्या असलेल्या आकाराचे बनविल्यास अशा शोभिवंत माश्यांच्या वाढविलेल्या बीजास बाजारात चांगली किंमत मिळू शकते तसेच शोभीवंत माश्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अतिशय चांगली मागणी आहे.
4. मत्स्यटाकी बनविने व विकणे : मत्स्यटाकीला घरात, हॉटेल, कॉलेजेस, दवाखान्यात मॉल्समध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. मत्स्य टाकी बनविणे व त्यात शोभिवंत मासे सोडणे मत्स्य टाकी वरील निर्देशीत केलेल्या ठिकाणी विकल्यास त्यातून चांगला मोबदला मिळू शकतो. महिला बचत गट व बेरोजगार हा व्यवसाय अतिशय नियोजनबद्द करू शकतात. मत्स्य टाकीला लागणार्या सामानाची व शोभीवंत मासे पाळून ते वाढविणे व जशी गरज लागेल तशी ग्राहकांपर्यंत पोहचवीणे हे ही यात समाविष्ट आहे.
5. मुल्यवर्धीत मत्स्यपदार्थ तयार करणे व विकणे : कमी दर्जाच्या व स्वस्त मासळी पासून मत्स्य पदार्थ बनविणे हे यात मोडते. आजवर आपण वडापाव, तसेच डोसा, पावभाजी, व इतर खाद्यपदार्थाच्या गाड्या पाहिल्या आहेत पण मत्स्य पदार्थ बनवून ते गाडीवर विकणे हे फार कमी बघावयास मिळते. स्वस्त मासळीपासून विविध पदार्थ बनविले जाऊ शकतात. त्यात प्रामुख्याने मत्स्य शेव, मत्स्य, चकली, मत्स्य वडा व कोळंबी लोणचे इत्यादी पदार्थ बनविले जाऊ शकतात. महिला बचत गट हे पदार्थ बनवून हॉटेलस, मॉल्स व घराघरापर्यंत पोहचवून विकू शकतात. हे पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण सुद्धा उपलब्ध आहे.
6. मॉल्स मधून मासे विकणे : महाराष्ट्रात व भारतामध्येही बर्याच ठिकाणी मॉल्स उघडली आहेत. या मॉल्समध्ये दैनंदिन जिवनाला लागणार्या वस्तू मिळतात. तसेच काही ठिकाणी मॉल्समध्ये (मस्य व मटन) विभाग उघडले गेले आहेत. या विभागामध्ये विविध मासे व विविध मत्स्य पदार्थ विकले जात असतात. अशा मॉल्समध्ये मासे किंवा मत्स्य पदार्थ विक्रीसाठी पाठविणे व मत्स्यमटन विभाग भाडे तत्त्वावर (मॉल्सच्या नियामानुसार ) चालवायला घेतल्यास अतिशय चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
7. शास्त्रोक्त पद्धतीने मत्स्य खाद्य निर्मिती : मत्स्यसंवर्धनात सर्वांत खर्चिक परंतु खूप महत्त्वाची बाब असते. ती म्हणजे मत्स्य खाद्य माशांची वाढ जोमाने व्हावी हे प्रत्येक मत्स्यपालन करणार्या इच्छुकांना वाटत असते. त्यासाठी सकस व माशांना पचनास सोपे असणारे जिवनावश्यक अन्न घटक असणारे खाद्य जसे की प्रथिने, कार्बेदके, विटामीन इत्यादी पोषकतत्व युक्त खाद्य बनविल्यास व ते मत्स्यशेती करणार्या इच्छुकांना विकल्यास रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
8. मासे व झिंगे पुरवठा : बरेच लोक हे खार्या पाण्याचे मासे किंवा झिंगे खाण्यासाठी इच्छुक असतात पण हे मासे किंवा झिंगे फक्त समुद्र किनारीच मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतात तेव्हा खार्या पाण्यातील मासे किंवा झिंगे ज्या भागात मिळत नाही (शहरांमध्ये) अशा ठिकाणी खार्या पाण्यातील माश्यांना व झिंग्यांना खूप मागणी असते. त्त्या ठिकाणी खार्या पाण्यातील माश्यांचा व झिंग्यांचा पुरवठा होऊ शकतो किंवा खार्या पाण्यातील मासळी केंद्राचे दुकाणे अशा शहरामध्ये उघडले जाऊ शकते व त्या सोबतच मासे किंवा झिंगे लघू किंवा मोठ्या हॉटेलमध्ये पुरवठा केल्यास रोजगारांचे चांगले साधन उपलब्ध होऊ शकते.
9. शैक्षणिक क्षेत्रात मासे पुरविणे : महाराष्ट्रात बरेच कॉलेजेस, शाळा व विविध शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. या संस्था कार्यारत आहेत. या संस्थेमध्ये मत्स्य विज्ञान प्रत्यक्षिकांसाठी लागत असतात अशा शैक्षणिक संस्थांना गोड्या, खार्या निमखार्या पाण्यातील मासे पुरविणे हा देखील एक स्वयंरोजगार निर्माण करणारा व्यवसाय ठरू शकतो.
10. पिंजर्यातील मत्स्य संवर्धन : वेगवेगवळ्या कृषी संलग्न क्षेत्रात महाराष्ट्रातील आपली कार्यक्षमता सिद्ध करून दाखवीली आहे. मत्स्य संवर्धन पद्धतीद्वारेदेखील मत्स्यशेती केली जाऊ शकते. शेतकर्यांना आधार मिळावा म्हणून पिंजर्यातील मत्स्यशेती हा व्यवसाय पुढे येत आहे. पिंजरा हा तलावात किंवा धरणांमध्ये ठेवला जातो. पिंजरा पद्धतीत मासे चांगले वाढल्याचे दिसून आले आहे. पिंजर्यात माशांची उत्पादन क्षमता 10 ते 20 पटीने वाढते. पिंजरा बांधणी हे तळे खोदण्यापेक्षा कमी खर्चिक आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
जिवंत माशांची वाहतूक आता शक्य !
सोप्या पद्धतीने अशी करा मत्स्यशेती
कोळंबी संवर्धनासाठी तलावाची पूर्व तयारी
गोडया पाण्यातील कोळंबी संवर्धनासाठी कशी करावी निरोगी बीजाची उपलब्धता
11. जिवंत मासे विक्री केंद्र : महाराष्ट्रात ठिकठिकाणी कोंबड्याचे मांस विक्री केंद्र आहेत. ग्राहक हवी त्या जिवंत कोंबडीचे मांस विकत घेत असतात. त्याचप्रमाणे जिवंत मासे विक्री केंद्र सुद्धा उघडले जाऊ शकते. त्यात ग्राहकास हवे असलेले जिवंत मासे आपल्या इच्छेनुसार घेऊ शकतात. मेलेल्या माश्यांच्या मासापेक्षा नुकतेच कापलेल्या ताज्या मास्यांना जास्तीची किंमत मिळू शकते. असे जिवंत मासे विक्री केंद्र महाराष्ट्रात क्विचीत बघावयास मिळतात. पिडीत ला पडीताचा आधार असा हा मत्स्य व्यवसाय बर्याचशा छोट्या मोठ्या उद्योगांच्या वाढीसाठी चालणा देणारा परकीय चलन मिळवून देण्याव्यतिरीक्त स्वस्त व पौष्टिक अन्नाचा पुरवठा तसेच उत्पन्न आणि नोकरीच्या संधी निर्माण करणारा हा उद्योग देशातील व महाराष्ट्रातील फार मोठ्या वर्गाचे उपजीविकेचे साधन बनू शकेल.
उमेश अरूण सूर्यवंशी, रोहीणी रावजी मुंगळे प्लॉट नं. 7 रूद टावर, कल्पना थेटर जवळ, शेलहाल रोड, उदगीर, जि. लातूर.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇